प्रसिद्धी न केल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 02:30 PM2020-01-17T14:30:15+5:302020-01-17T14:41:18+5:30

गेल्या वर्षाच्या तुलनेत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजारांनी संख्या कमी

Decrease in scholarship applications due to lack of publicity | प्रसिद्धी न केल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांत घट

प्रसिद्धी न केल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांत घट

googlenewsNext
ठळक मुद्देराजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना पुणे विभागात या शिष्यवृत्तीसाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात ५९ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी अर्ज ४४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागातर्फे मंजूर विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत विविध माध्यमातून व्यापक माहिती देणे गरजेचे

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची प्रसिद्धी न केल्यामुळे शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १४ हजाराने घटली आहे. मात्र, शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यापीठांचे कुलसचिव यांची राहिल, असे परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे काढले आहे.
गेल्या काही वर्षांपासून उच्च शिक्षण संचालनालयातर्फे १४ शिष्यवृती योजनांसाठी अर्ज मागविले जात आहेत. त्यात आठ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या  विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो. व्यावसायिक व अव्यावसायिक या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणवृत्तीसाठी अर्ज करता येतो. परंतु, विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती झाली नाही. त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असल्याचे दिसून आले आहे. पुणे विभागात या शिष्यवृत्तीसाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात ५९ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ४४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागातर्फे मंजूर केले होते.
महाडीबीटी पोर्टलवरून शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज केले जातात. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत दिली होती. या मुदतीपर्यंत ४५ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी ४४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागातर्फे मंजूर ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा केले आहेत. त्यातील केवळ ३१ हजार ८१३ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाने मंजूर केले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १४ हजार ५१२ एवढी घट झाली आहे.
......
या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. 
एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत विविध माध्यमातून व्यापक माहिती देणे गरजेचे आहे. 
त्यामुळे विविध शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होतील याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.

Web Title: Decrease in scholarship applications due to lack of publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.