राज्यात गोवंशाचे घटते प्रमाण चिंताजनक

By admin | Published: September 12, 2015 02:01 AM2015-09-12T02:01:04+5:302015-09-12T02:01:04+5:30

शेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे

Decreasing evidence of cow dung in the state is worrisome | राज्यात गोवंशाचे घटते प्रमाण चिंताजनक

राज्यात गोवंशाचे घटते प्रमाण चिंताजनक

Next

- नितीन गव्हाळे,  अकोला
शेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे प्रमाण घटू लागले. १९व्या पशुगणनेतील आकडेवारीनुसार दरवर्षी राज्यात ३0 हजारांवर गोवंश घटत आहे.
गोवंशाचा विचार केला असता, पूर्वी महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक होता आणि दर १00 हेक्टर पिकांखालील जमिनीमागे ११६ जनावरे एवढी घनता होती. २00७च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येमागे ३८ हजार इतके गोवंश होते. हेच प्रमाण २00३ मध्ये ३९ हजार होते.
१९९७मध्ये दर लाख लोकसंख्येमागील गोवंशाचे प्रमाण ५0 हजार होते. सातत्याने गोवंशाचे प्रमाण घटत असल्याचे यावरून स्पष्ट होते. गोवंश घटण्यामागे मांसासाठी सुरू असलेली कत्तल, ट्रॅक्टरचा वाढलेला अतिवापर, चाऱ्याची टंचाई ही प्रमुख कारणे आहेत. पशुगणनेनुसार २00७ मध्ये राज्यात १ कोटी ६१ लाख ८३ हजार ५२७ (गाय व बैल) होते. २0१२ मध्ये त्यात ६ लाख ९९ हजार ३२0 गोवंशाची घट होऊन, ते १ कोटी ५४ लाख ८४ हजार २0७ पर्यंत आले.

पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतन कार्यक्रमाच्या माध्यमातून गोधन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. असे असतानाही गोधन घटत आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोपालनाकडे वळले पाहिजे तरच शेती, कुटुंबाचा विकास साधला जाईल आणि गोधनवाढीसही हातभार लागेल.
-डॉ. अशोक हजारे, विभागीय सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती

Web Title: Decreasing evidence of cow dung in the state is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.