छोटा राजनवरील २० गुन्ह्यांचा सखोल तपास

By admin | Published: November 5, 2015 03:03 AM2015-11-05T03:03:11+5:302015-11-05T03:03:11+5:30

कुख्यात गँगस्टर छोटा राजन याच्याविरुद्ध खून, खंडणी व अपहरणाचे ७५ गुन्हे दाखल असले, तरी महत्त्वाच्या २० गुन्ह्यांबाबत सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणात राजनचा सहभाग

Deep Rajan investigating 20 cases | छोटा राजनवरील २० गुन्ह्यांचा सखोल तपास

छोटा राजनवरील २० गुन्ह्यांचा सखोल तपास

Next

- जमीर काझी,  मुंबई
कुख्यात गँगस्टर छोटा राजन याच्याविरुद्ध खून, खंडणी व अपहरणाचे ७५ गुन्हे दाखल असले, तरी महत्त्वाच्या २० गुन्ह्यांबाबत सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणात राजनचा सहभाग असल्याचे थेट पुरावे असल्याने त्याची चौकशी करून गुन्हे सिद्ध करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
न्यायालयात त्याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध होऊन शंभर टक्के शिक्षा होईल, अशा गुन्ह्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये १९८२ मधील टिळकनगरातील खुनापासून ते ११ जून २०११ रोजी झालेल्या पत्रकार जे.डे. यांच्या खून खटल्याच्या समावेश असल्याचे क्राइम ब्रँचमधील या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. छोटा राजनला भारतात आणल्यानंतर पहिल्यांदा सीबीआय त्याचा ताब्यात घेईल. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडूनही बनावट पासपोर्टप्रकरणी ताबा मिळण्यासाठी दावा केला जाईल. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तो दिवाळीनंतर मुंबईत आणला जाईल, या दृष्टीने क्राइम ब्रँचमधील अधिकाऱ्यांचे पथक गुन्ह्यांचा आढावा घेत आहे. सबळ पुरावे असलेल्या गुन्ह्यांची यादी बनविण्यात आली आहे. त्यात इंटरपोलकडे देण्यात आलेल्या १४ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसह जवळपास अन्य सहा गुन्ह्यांचा समावेश आहे.

अंडासेल मुंबई पोलिसांच्या ताब्यात
छोटा राजनला डी गँगकडून धोका असल्याने त्याला आॅर्थर रोड कारागृहातील १२-ब ब्लॉकमधील तळमजल्यावरील अंडासेलमध्ये ठेवले जाईल, हे निश्चित झाले आहे. त्या परिसराचा तात्पुरता ताबा सध्या मुंबई पोलिसांनी घेतला आहे. ‘२६/११’ मधील अतिरेकी अजमल कसाबला याच अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते. आता या तळमजल्याचा कारागृह क्षेत्राचा दर्जा रद्द केल्याने मुंबई पोलिसांना चौकशीसाठी तेथे सहजपणे जाता येईल. राजनविरुद्धचा तपास पूर्ण होईपर्यंत दरवर्षी एक रुपया दराने त्याबाबत भाडे आकारले जाणार असल्याचे गृह विभागाकडून स्पष्ट केले आहे.

पोलिसांना वेळ घालवायचा नाही : अपहरण व खंडणी आणि हाफ मर्डरचे छोटा राजनवर अनेक गुन्हे दाखल असले, तरी त्यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये फिर्यादीने छोटा राजनच्या नावाने फोन आला होता, असे सांगितले आहे. राजन गँगचे असल्याचे सांगून आरोपींनी गुन्हा केल्याचे नमूद आहे. मात्र, त्याच्या सहभागाबाबत कोणताच सबळ पुरावा पोलिसांच्या हाती नाही, त्यामुळे न्यायालयात त्याच्यावर दोष सिद्ध होणे अशक्य असल्याने, त्याबाबत तपास करून वेळ दवडला जाणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Deep Rajan investigating 20 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.