Maharashtra Political Crisis: “नितीश कुमार भाजपसोबत आले होते तेव्हा काय झाले, शरद पवारांनी...”; दीपक केसरकरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:31 AM2022-08-11T11:31:22+5:302022-08-11T11:32:18+5:30

Maharashtra Political Crisis: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो, असे दीपक केसरकर म्हणाले.

deepak kesarkar reaction on ncp chief sharad pawar statement on bihar political crisis | Maharashtra Political Crisis: “नितीश कुमार भाजपसोबत आले होते तेव्हा काय झाले, शरद पवारांनी...”; दीपक केसरकरांचा सल्ला

Maharashtra Political Crisis: “नितीश कुमार भाजपसोबत आले होते तेव्हा काय झाले, शरद पवारांनी...”; दीपक केसरकरांचा सल्ला

Next

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर शिंदे गटातील नव्या मंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. तत्पूर्वी, एका कार्यक्रमात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना एक सल्ला दिला आहे. 

खातेवाटपाबाबत मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार असून, लवकरच खाते वाटपाचे काम उघड होणार आहे, आधी कोणाचे खाते होते, आता खाते कोणाला मिळणार किंवा प्रसारमाध्यमांमध्ये काय सुरू आहे. एक मार्ग, आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे खाते वाटपाचे काम झाले नाही, अनेक महत्त्वाचे निर्णयावर बैठक झाली अशी माहिती दिपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. बच्चू कडू हे आमचे ज्येष्ठ सहकर्मी आहेत, आणि आम्हाला मर्यादा होती, शिवसेनेकडे किती मंत्री आहेत, मंत्रिपद देणे गरजेचे होते, मी मागे असेन, असे भरत गोगावले म्हणाले होते पण दीपक केसरकर यांना मंत्रीपद द्यावे, कारण पक्षाची बाजू त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. मला खात्री आहे की आधीच्या सरकारमध्ये भरत गोगावले हे राज्यमंत्री होते. त्यापेक्षा वरचे पद मुख्यमंत्र्यांच्या मनात असेल. कोणत्याही परिस्थितीत कोणीही रागावू नये. आम्ही लवकरच भेटणार आहोत, येत्या मंत्रिमंडळ विस्तारात योग्य सन्मान होणार आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. 

त्यांना सांभाळणे आपले काम आहे

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी लक्ष द्यायला हवे जर आपण मित्र पक्ष आणि मोठ्या पक्षासोबत काम करत असाल तर त्यांना सांभाळणे आपले काम आहे. प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो. राष्ट्रवादी वाढवताना पवार साहेब तुम्ही किती कष्ट केले ते कळेल, त्यावेळी त्यांना अनेक पक्ष फोडावे लागले असते. पण हा राजकारणाचा भाग आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. तुम्ही बिहारमध्ये सत्ताबदल पाहिला आहे, याआधीही सत्तापरिवर्तन झाले होते. पण त्यावेळी ते भाजपसोबत आले तेव्हा काय झाले, याचा अर्थ भाजप इथे जी ट्रीटमेंट मिळायची त्यापेक्षा वेगळी ट्रीटमेंट इथे मिळते. या कारणासाठी भाजप सोडून गेला, राजकारणात असे घडते की अनुभव आल्यावर निर्णय घेतला जातो, असे केसरकर यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: deepak kesarkar reaction on ncp chief sharad pawar statement on bihar political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.