Deepak Kesarkar : मालवण प्रकरण : जयदीप आपटेला कोणी दिलं होतं काम?; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 02:12 PM2024-08-31T14:12:16+5:302024-08-31T14:18:11+5:30

Deepak Kesarkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

Deepak Kesarkar reaction over chhatrapati shivaji maharaj statue malvan | Deepak Kesarkar : मालवण प्रकरण : जयदीप आपटेला कोणी दिलं होतं काम?; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

Deepak Kesarkar : मालवण प्रकरण : जयदीप आपटेला कोणी दिलं होतं काम?; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. याच दरम्यान आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

जयदीप आपटेला कोणी काम दिलं होतं? असा प्रश्न विचारला असता केसरकरांनी त्यावर उत्तर दिलं आहे. "एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे हा महाराष्ट्र शासन आणि नेव्हीचा एकत्रित उपक्रम होता. त्यामुळे या कार्यक्रमाकडे बघताना या दृष्टीने बघता कामा नये. त्यामध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे, त्याकडे बघितलं पाहिजे. चूक, अपघात घडू शकतात, पण महाराजांचे जे ब्रीदवाक्य होतं ते नेव्हीच्या फ्लॅगवर अभिमानाने फडकतं" असं केसरकरांनी म्हटलं आहे. 

मालवणमध्ये नवीन पुतळा बसवण्यासाठीची प्रक्रिया कशी असेल याबाबतही दीपक केसरकर यांनी माहिती दिली. "मुख्यमंत्र्यांनी मालवणमधील प्रकरणाबाबत तीन बैठका घेतल्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार उपस्थित होते, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं जात आहे. भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल, परिसराचा ही विकास केला जाणार आहे" असं केसरकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. 

 "छत्रपतींना तरी सोडा, कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे...", शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला संताप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. "मला इतकं दुखं होतंय की हे सांगताहेत ताशी ४५ किमी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ३५० वर्षांपूर्वीचा सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. त्यांचे इतके गडकिल्ले अजूनही उभे आहेत. त्यापेक्षा जास्त वारा ते सोसत आहेत. त्यामुळे तुम्ही किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा" असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Deepak Kesarkar reaction over chhatrapati shivaji maharaj statue malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.