दीपक क्षीरसागर वसईचे प्रांत
By Admin | Published: September 18, 2016 02:11 AM2016-09-18T02:11:08+5:302016-09-18T02:11:08+5:30
वसईच्या प्रांताधिकारीपदी एमआयडीसीचे पनवेल येथील प्रादेशिक अधिकारी दीपक क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली
वसई : वसईच्या प्रांताधिकारीपदी एमआयडीसीचे पनवेल येथील प्रादेशिक अधिकारी दीपक क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळत्या प्रांताधिकाऱ्यांना बदलीचे कोणतेही ठिकाण दाखवण्यात आलेले नाही.
क्षीरसागर यांनी २००८ साली तीन महिन्यांसाठी पालघर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. वसईसाठी स्वतंत्र प्रांताधिकारी देण्याचा निर्णय झाल्यानंतर दादासाहेब दातकर यांची पहिले प्रांताधिकारी म्हणून वर्णी लागली होती. मात्र, दातकर पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वसईतील जमिनीशी संबंधित अनेक प्रकरणात दातकर यांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे काही संघटनांनी दातकर यांच्याविरोधात आंदोलन केले होते. मे २०१६ मध्ये दातकर यांची बदली झाली होती. मात्र, ती थांबवण्यात आली होती. दातकर माजी मंत्री पतंगराव कदम यांच्याकडे खाजगी सचिव असताना अॅन्टीकरप्शनने कारवाई केली होती. त्यानंतर दातकर यांना निलंबित करण्यात आले होते. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केलेल्या ज्या १२० अधिकाऱ्यांच्या बदलीच्या यादीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यात दातकर यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांना अद्याप नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही.(प्रतिनिधी)