लोकलमधून पडून जखमी झालेल्या दीपाली ढोमसेला आर्थिक मदतीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 12:43 PM2018-04-23T12:43:27+5:302018-04-23T19:42:49+5:30

मोलमजुरी करून तीन मुलींचा सांभाळ करणा-या आईला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशानं घराबाहेर पडलेल्या दीपाली ढोमसेचा लोकलमधून पडून अपघात झाला.

Deepali Dhomse, who was injured in the local accident, needed financial help | लोकलमधून पडून जखमी झालेल्या दीपाली ढोमसेला आर्थिक मदतीची गरज

लोकलमधून पडून जखमी झालेल्या दीपाली ढोमसेला आर्थिक मदतीची गरज

Next

कल्याण- मोलमजुरी करून तीन मुलींचा सांभाळ करणा-या आईला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशानं घराबाहेर पडलेल्या दीपाली ढोमसेचा लोकलमधून पडून अपघात झाला. इंटरव्ह्यू देऊन परतणा-या दीपालीला दिवा-कोपरदरम्यान लोकलमधून पडून झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली. रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी दिवा-कोपरदरम्यान मोटरमनला रेल्वे ट्रकलगत कुणीतरी पडल्याचे आढळल्यानंतर त्याने दीपालीला लोकलमधून डोंबिवली स्थानकात आणले. येथून तिला रुग्णालयात नेण्यात आले.

बेशुद्ध असलेल्या दीपालीच्या मणक्याला फॅक्चर झाले आहे, तसेच छातीला आणि चेह-याला मार लागलाय. तिच्या डाव्या बाजूची हालचालही होत नाहीये. तिने उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.  मात्र तिच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यानं रुग्णालयाचं बिल भरण्यासाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. पैशांशिवाय हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कसा मिळणार, असा प्रश्न कुटुंबीयांना पडलाय. तीन मुली झाल्यामुळे दीपालीच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट दिला आहे. त्यामुळे चार घरची धुणीभांडी करून तिची आई तिन्ही मुलींचं पालन-पोषण करते.



आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दहावीची परीक्षा दिल्यानंतर दीपालीनं मैत्रिणीच्या मदतीनं नोकरीचा शोध सुरू केला होता. दीपालीची एक बहीण यंदा दहावीला, तर दुसरी आठवीत आहे. दीपाली आदिशक्ती ढोलताशा पथकाची सदस्य आहे. या अपघातग्रस्त तरुणीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. दीपालीवर ओढावलेल्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी तिला आर्थिक मदत करण्याचे आवाहन आदिशक्ती ढोल पथक प्रमुख प्राजक्ता देशपांडे यांनी केले आहे. ढोलताशा पथक प्रमुख प्राजक्ता देशपांडे यांनी तिला काही प्रमाणात आर्थिक मदत केली असली तरी दानशूर व्यक्तीनं दीपालीला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे. दीपालीला मदत करायची असल्यास या नंबरवर 9833118716 संपर्क साधा. तसेच दीपालीला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही मदतीचा हात दिलाय. त्यांनी तिच्या औषधांचा सर्व खर्च उचलला असून, तिची तब्येत पूर्णतः स्वस्थ होत नाही, तोपर्यंतचा रुग्णालयासह उपचारांचा खर्च श्रीकांत शिंदे उचलणार आहेत. 

मदतीसाठी प्राजक्ता देशपांडे यांच्या खात्यावरही पैसे जमा करू शकता.
Ac no. - 6546038203 
Ifsc code. - IDIB000D047
Indian bank
Prajakta Deshpande

Web Title: Deepali Dhomse, who was injured in the local accident, needed financial help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.