राजभवनात आज रंगणार लोकमतचा ‘दीपोत्सव’
By admin | Published: September 16, 2015 03:29 AM2015-09-16T03:29:35+5:302015-09-16T03:29:35+5:30
मराठी दिवाळी अंकांच्या जगतात लोकमत ‘दीपोत्सव’ने एक लाखाहून अधिक प्रतींच्या विक्रीची नोंद करीत अभूतपूर्व सन्मान मिळविला आहे. आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनने
मुंबई : मराठी दिवाळी अंकांच्या जगतात लोकमत ‘दीपोत्सव’ने एक लाखाहून अधिक प्रतींच्या विक्रीची नोंद करीत अभूतपूर्व सन्मान मिळविला आहे. आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनने (एबीसी) त्यावर मोहोर उमटवत प्र्रमाणपत्र दिले आहे.
एक लाख दिवाळी अंकांच्या विक्रीचा विक्रम नोंदविणारा हा देशातील पहिला मराठी दिवाळी अंक ठरला असून, त्याप्रीत्यर्थ बुधवारी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजभवनातील ‘दरबार हॉल’ येथील या कार्यक्रमात मुख्यमंत्री ‘लोकमत’ला मिळालेले ‘एबीसी’ प्रमाणपत्र राव यांच्याकडे सुपुर्द करतील. सायंकाळी ४ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा खप असलेल्या लोकमतच्या शिरपेचात ‘दीपोत्सव’च्या रूपाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘दीपोत्सव’ची आकर्षक मांडणी, विषय हे आता मराठी माणसाच्या संस्कृतीचा मानबिंदू ठरले आहेत.