बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदेंची माफी मागावी - मुख्यमंत्री

By admin | Published: July 17, 2016 07:46 PM2016-07-17T19:46:32+5:302016-07-17T23:57:12+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आरोपीचा नाही. ती व्यक्ती दुसरीच आहे. फक्त नावात साधर्म्य आहे. विनाकारण बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदे यांची जाहीर माफी मागावी. असे मुख्यमंत्री म्हणाले

Defamationists should apologize to Ram Shinde - CM | बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदेंची माफी मागावी - मुख्यमंत्री

बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदेंची माफी मागावी - मुख्यमंत्री

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि, १७ : राम शिंदे यांच्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आरोपीचा नाही. ती व्यक्ती दुसरीच आहे. फक्त नावात साधर्म्य आहे. विनाकारण बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदे यांची जाहीर माफी मागावी. असे मुख्यमंत्री म्हणाले. कोपर्डी प्रकरणावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
कोपर्डी प्रकरणात POSCO कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वल निकम यांना कोपर्डी बालात्कार प्रकरणाचे वकीलपत्र घेण्याची विनंती सरकारकडून केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत लवकरच जाहीर करु, शिवाय, पीडित कुटुंबियांच्या पाठिशी आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
दरम्यान, राम शिंदेंसोबत फोटोत असलेली व्यक्ती कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला होता. शिवाय, राम शिंदेंच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली होती. 
 
 

Web Title: Defamationists should apologize to Ram Shinde - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.