मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील कैदी आता कारागृहात सुरक्षा रक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:22 AM2017-09-08T04:22:06+5:302017-09-08T04:23:05+5:30
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील सिद्धदोष आरोपी आता कारागृहात सुरक्षा रक्षक (वॉचमन) म्हणून कार्यरत आहेत.
नरेश डोंगरे
नागपूर : मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील सिद्धदोष आरोपी आता कारागृहात सुरक्षा रक्षक (वॉचमन) म्हणून कार्यरत आहेत. या खटल्याच्या पहिल्या टप्प्यात ठोठावण्यात आलेली आजन्म कारावासाची शिक्षा भोगताना शिस्तीची कास धरल्यामुळे अजगर मुकादम तसेच अब्दुल गनी तुर्क या दोघांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. कारागृहातील विविध उपक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी ते उत्साहाने पार पाडत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रारंभी सुतारकाम, विणकाम करणाºया या दोघांनी नंतर कारागृहात शिस्तीची कास धरली. स्वत:सोबतच इतर कैद्यांमध्येही बदल करण्याचे प्रयत्न सुरू केले. कारागृहात शिकविला जाणारा गांधीवाद शिकणे सुरू केले.