लोकप्रतिनिधींकडूनच दारूविक्रेत्याचा बचाव

By admin | Published: August 4, 2016 12:56 AM2016-08-04T00:56:44+5:302016-08-04T00:56:44+5:30

भाषणातून डंका वाजविणारे लोकप्रतिनिधीच अवैध विक्रेत्याच्या बचावासाठी पोलिसांकडे शिफारस करीत असल्याचा प्रकार लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये दिसून आला

The defendant of the alcoholic from the Representatives | लोकप्रतिनिधींकडूनच दारूविक्रेत्याचा बचाव

लोकप्रतिनिधींकडूनच दारूविक्रेत्याचा बचाव

Next


वाघोली : महिलांच्या जिव्हाळ््याच्या प्रश्नाला हात घालून दारूबंदी व्हावी, यासाठी भाषणातून डंका वाजविणारे लोकप्रतिनिधीच अवैध विक्रेत्याच्या बचावासाठी पोलिसांकडे शिफारस करीत असल्याचा प्रकार लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये दिसून आला. दारू विक्रेत्यावर कारवाईच्या पोलिसांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे मात्र त्यांचा डाव फसला आहे.
पोलिसांकडे दारूविक्रीची तक्रार केल्याचा राग मनात धरून भावडी (ता. हवेली) येथील अवैध दारूविक्रेत्याने तरुणास केलेल्या मारहाणीचे पडसाद वाघोली परिसरामध्ये दिसू लागले आहेत. या दारू विक्रेत्याची बाजू घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय समितीच्या सदस्यांनीदेखील पोलिसांकडे धाव घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
लोणीकंद पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून मारहाण झाल्याने या प्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. प्रकरण मिटविण्यासाठी नित्यनियमाप्रमाणे राजकीय दबावदेखील वापरला असला तरी यामध्ये मारहाण झालेल्या तरुणाच्या बाजूने उभे न राहता दारू विक्रेत्यांच्या बाजूने पोलिसांकडे कैफियत मांडली असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
>राजकीय मंडळींचा अडसर
दारूबंदीसाठी झगडणाऱ्या भावडीतील महिलांना आता दारू बंदीसाठी राजकीय मंडळीचाच अडसर असल्याचे या प्रकरणातून दिसून आले आहे. सर्वसामान्यांची बाजू मांडण्याऐवजी दारूविक्रेत्यांची बाजू मांडणाऱ्या राजकीय मंडळीची वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे.

Web Title: The defendant of the alcoholic from the Representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.