पाच जिल्ह्यांत १८०८ गुन्ह्यांची घट - विश्वास नांगरे-पाटील
By admin | Published: January 20, 2017 07:50 PM2017-01-20T19:50:08+5:302017-01-20T19:50:08+5:30
कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता गंभीर गुन्ह्यांपैकी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गर्दी-मारामारी, बलात्कार, विनयभंग
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 - कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता गंभीर गुन्ह्यांपैकी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गर्दी-मारामारी, बलात्कार, विनयभंग, दुखापत असे सुमारे २६ हजार ८४२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत १८०८ गुन्ह्यांची घट झाली आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नांगरे-पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या सधन भाग असल्याने येथील स्थानिक गुन्हेगारांबरोबरच शेजारील राज्यांतील गुन्हेगारांचे आव्हान पोलिसांसमोर होते. आपल्या अधिकाराखालील पोलिस अधिकारी व कर्मचाºयांना विश्वासात घेऊन अशा गुन्हेगारांबाबत कायद्याने दिलेले अधिकार वापरण्याकरीता प्रोत्साहित करून पाठपुरावा केला. त्यामध्ये मोक्कांतर्गत एकूण २६ कारवाया करून १९६ आरोपींविरुद्ध कारवाई केली तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत १८ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत ‘कलम ५५’ नुसार ४०, कलम ५६-२१६, कलम ५७-११२ कारवाया करत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. पुणे ग्रामीणमधील अट्टल गुन्हेगार शाम दाभाडे व त्याच्या साथीदारांना पोलिस चकमकीत मारल्याने तिथे आता शांतता आहे. यावर्षी १५२ फरार व ४१३ पाहिजे असलेले आरोपी पकडले आहेत. गुन्हेगारांकडे असणारी शस्त्रे असे एकूण ८६ गुन्हे दाखल करून परदेशी-देशी बनावटीची पिस्टल ५१, रिव्हॉल्व्हर १०, गावठी कट्टा १०, बंदूक ५, काडतुसे १२४ जप्त केली आहेत. शस्त्र पुरवठा करणा-यांवरही कारवाई केली आहे. परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यांत २०१६ मध्ये २६ हजार ८४२ गुन्हे दाखल असून गतवर्षीची तुलना करता १८०८ गुन्ह्यांची घट झाली आहे. तपासाची योग्य दिशा ठरवून तपासी अंमलदारांना वरिष्ठ अधिका-यांतर्फे मार्गदर्शन केल्याने न्यायालयात चालणा-या खटल्यांमध्ये गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण ४१ टक्के आहे तसेच न्यायालयाकडून समन्स बजावणीचे प्रमाण ९० व वॉरंटचे प्रमाण ८२ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे (कोल्हापूर), दत्तात्रय शिंदे (सांगली), संदीप पाटील (सातारा), वीरेश प्रभू (सोलापूर ग्रामीण), अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे (पुणे ग्रामीण) हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
.............................
गुन्हेगारांचे आदान-प्रदान
गुन्हेगारांवर मानसिक दबाव ठेवणे, त्यांची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना व्हावी, याकरिता गुन्हेगार आदान-प्रदान योजना चालू केली आहे. परिस्थितीमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना पुनर्वसनासाठी समुपदेशन होऊन समाजामध्ये चांगले जीवन जगता यावे यासाठी ‘आरोपी दत्तक योजना’ सुरू केली आहे. त्यामध्ये ‘एका पोलिस कर्मचाºयास एक आरोपी’ अशी दत्तक योजना राबविली आहे.
-------------------------------
१००८ ग्रामपंचायतींचे ठराव
अवैध धंदे बंद करण्याबाबत जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना कडक सूचना दिल्या आहेत. यावर्षी २३७३ गुन्हे दाखल करून गुन्ह्यांच्या मुळाशी असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली आहे. हे धंदे बंद करण्यासाठी परिक्षेत्रातील १००८ ग्रामपंचायतींनी ठराव सादर केले आहेत.
---------------------------------
मोक्का लावलेल्या टोळ्या : (कंसात आरोपी संख्या)
कोल्हापूर - एस. टी. ऊर्फ स्वप्निल तहसीलदार (१२), अमोल अशोक माळी (८), राजवर्धन पाटील (१०), सांगली - एम. डी. ऊर्फ महंमद नदाफ (८), प्रशांत पवार (१३), विजय शिंदे (५), मधुकर वाघमोडे (६), सातारा - योगेश अहिवळे (११), रॉयल सिक्वेरा (६), सोलापूर - मनिष काळे (३), पुणे - शाम दाभाडे (१०), सचिन इथापे (१०), अविनाश भोसले (७), गणेश अगरवाल (६).
----------------------------
हद्दपार प्रमुख गुन्हेगार टोळ्या - (कंसात आरोपी संख्या)
कोल्हापूर - बबन लाला कवाळे (४), सलीम यासीन मुल्ला (६), शंकर भास्कर (७), शंकर पवार (५), सांगली - रणजित पाटील (५), सतीश बाळाराम जाधव (२), सतीश पवार (४),सातारा - समीर कच्छी (५), जब्बार पठाण (६), यासीन शेख (६), सोलापूर - रूपला किसन राठोड (६), पुणे - मंगेश देशमुख (३), नीलेश कुर्लप (११), पप्पू राजापूरे (७).
---------------------------
परिक्षेत्रातील गुन्ह्यांची आकडेवारी (२०१६)
खून ३७५, खुनाचा प्रयत्न ३०७, दरोडा ८६, जबरी चोरी ५०२, घरफोडी १५७३, चोरी ६०१४, ठकबाजी ८१९, गर्दी-मारामारी १७८०, दुखापत ३८६९, बलात्कार ५४६, विनयभंग १३८८, सार्वजनिक ठिकाणी हल्ला ३८५ यासह इतर.