Deglur Election Result, Dadra and Nagar Haveli Result 2021: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, देगलूरमध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकरांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:15 AM2021-11-02T10:15:09+5:302021-11-02T16:59:57+5:30

Deglur Election Result, Dadra and Nagar Haveli Result 2021: आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.

Deglur Election Result, Dadra and Nagar Haveli Result 2021: LIVE Vote Counting and Updates Today in Marathi, Winner Congress NCP BJP Shiv Sena Seats News | Deglur Election Result, Dadra and Nagar Haveli Result 2021: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, देगलूरमध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकरांची बाजी

Deglur Election Result, Dadra and Nagar Haveli Result 2021: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, देगलूरमध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकरांची बाजी

googlenewsNext

मुंबई : काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिडणुकीच्या निकालाची आज निकाल आहे. तसेच, फेब्रुवारी 2021 मध्ये अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे केंद्रशासित प्रदेशातील दादरा नगर हवेली या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी झाली. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.

देगलूर विधानसभा निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. 12 उमेदवार रिंगणात असले तरी 3 पक्षात प्रामुख्याने ही लढत होती. अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (jitesh antapurkar), भाजपचे उमेदवार सुभाष साबणे (Subhash Sabane) तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.

दादरा नगर हवेलीच्या एकमेव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होती. या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. तर भाजपकडून महेशभाई गावित यांना उमेदवारी दिली. या जागेसाठी तिन्ही पक्षांकडून प्रचारासाठी दिग्गज नेतेमंडळी उतरली होती.

देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरा यांनी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांना 30 व्या फेरी अखेर 1 लाख 8 हजार 789 मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यांना 11 हजार 347 मते मिळाली. जितेश अंतापूरकर यांनी तब्बल 41 हजार 933  मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. 

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  29 व्या फेरीअखेर
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 107329
भाजप - सुभाष साबणे – 65772
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 11097
- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 41557 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  26 व्या फेरीअखेर
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 97157
भाजप - सुभाष साबणे – 59031
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 10466
- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  25 व्या फेरीअखेर
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 94221
भाजप - सुभाष साबणे – 56959
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 10389
- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 37262 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  24 व्या फेरीअखेर
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 90421
भाजप - सुभाष साबणे – 54626
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 10201
- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : 23 वी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 86850
भाजप - सुभाष साबणे – 52425
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 9841
- काँग्रेसचे जितेश अंतापूरकरांची आघाडी कायम

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणी : कलाबेन डेलकर यांचा विजय
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय झाला आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 63,382 मते मिळाली. या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. 

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : 21 वी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 78923
भाजप - सुभाष साबणे – 45452
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 8856
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 30266 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : 20 वी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 74821
भाजप - सुभाष साबणे – 47058
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 8019
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 27763 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : 19 वी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 70675
भाजप - सुभाष साबणे – 45452
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 7668
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेना ऐतिहासिक विजयाच्या दिशेने
दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. कलाबेन डेलकर 47 हजार 437 मतांनी आघाडीवर आहेत.

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : सतरावी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 63537
भाजप - सुभाष साबणे – 40835
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 6953
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 22702 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : सोळावी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 60116
भाजप - सुभाष साबणे – 39034
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 6388
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 21082 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : चौदावी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 52599
भाजप - सुभाष साबणे – 34857
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 5059
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 17742 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : तेरावी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 48530
भाजप - सुभाष साबणे – 32292
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 5059
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 16238 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : बारावी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 44344
भाजप - सुभाष साबणे – 30169
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 4464
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : अकरावी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 40523
भाजप - सुभाष साबणे – 27943
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 4047
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणी : कलाबेन डेलकर आघाडीवर


देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : दहावी फेरी 
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 36592
भाजप - सुभाष साबणे – 25623
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 3560
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक : कलाबेन डेलकर यांची आघाडी कायम
दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकरयांची आघाडी कायम, 15 हजार 315 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : नववी फेरी 
काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 33068
भाजप - सुभाष साबणे – 22486
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 3022
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  सातव्या फेरीअखेर
काँग्रेस  - जितेश अंतापूरकर - 25376
भाजप - सुभाष साबणे -  – 17164
वंचित बहुजन आघाडी -डॉ. उत्तमराव इंगोले - 2257
जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : सहावी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर काँग्रेस – 4085
भाजप - सुभाष साबणे भाजप- 2487
वंचित बहुजन आघाडी -डॉ. उत्तमराव इंगोले -335
- जितेश अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : पाचवी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर काँग्रेस – 18245
भाजप - सुभाष साबणे भाजप- 12077
वंचित बहुजन आघाडी -डॉ. उत्तमराव इंगोले -1505
- जितेश अंतापूरकर 6168 ने आघाडीवर

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणी : कलाबेन डेलकर 6307 मतांनी आघाडीवर
दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 26 हजार 076 तर भाजपच्या महेश गावित यांना 19769 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या महेश धोदी यांना 1153 मतं मिळाली आहेत.

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : चौथी फेरी
काँग्रेस - जितेश अंतापूरकर - 14500
भाजप - सुभाष साबणे - 9943
वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले - 1225
- अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा निवडणूक मतमोजणी - काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर तिसऱ्या फेरीअखेर 3264 मतांनी आघाडीवर
- जितेश अंतपुरकर (काँग्रेस)- 3418
- सुभाष साबणे (भाजप)-2447
- डॉ उत्तम इंगोले (वंचित)- 104

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणी
सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये कलाबेन डेलकर या सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 18 हजार 992 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या महेशभाई गावित यांना 13 हजार 486 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांना 747 मते मिळाली आहेत. आता कलाबेन डेलकर यांनी ही आघाडी कायम ठेवल्यास शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर पहिला आमदार मिळण्याची शक्यता आहे. 

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी - दुसरी फेरी
जितेश अंतापूरकर- 3078
सुभाष साबणे - 2409
डॉ. उत्तमराव इंगोले - 449

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी - पहिली फेरी

जितेश अंतापूरकर – 4216
सुभाष साबणे – 2592
डॉ. उत्तमराव इंगोले – 320

Web Title: Deglur Election Result, Dadra and Nagar Haveli Result 2021: LIVE Vote Counting and Updates Today in Marathi, Winner Congress NCP BJP Shiv Sena Seats News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.