दिव्यांग विद्यार्थिनींच्या विद्यावेतनाला विलंब

By Admin | Published: March 18, 2017 02:06 AM2017-03-18T02:06:33+5:302017-03-18T02:06:33+5:30

शासकीय अनुदानित शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थिनींकरिता विद्यावेतन म्हणून २ कोटी ८६ लाख २ हजार इतका निधी जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला आहे.

Delay in Divya Vidyarthi's education | दिव्यांग विद्यार्थिनींच्या विद्यावेतनाला विलंब

दिव्यांग विद्यार्थिनींच्या विद्यावेतनाला विलंब

googlenewsNext

- अविनाश साबापुरे, यवतमाळ

शासकीय अनुदानित शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थिनींकरिता विद्यावेतन म्हणून २ कोटी ८६ लाख २ हजार इतका निधी जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला आहे. मात्र, गटशिक्षणाधिकारी स्तरावरून बँक खात्यांची अचूक माहिती न मिळाल्याने हे पैसे अद्यापही हजारो विद्यार्थिनींपर्यंत पोहोचलेले नाही.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा हा निधी अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींकरिता जिल्हास्तरावर मिळाला आहे. विशेष म्हणजे, अपंग विद्यार्थिनींची अद्ययावत माहिती अभियानाच्या संकेतस्थळावर भरण्याविषयी यापूर्वीच निर्देश देण्यात आले होते. तरीही एकंदर १७ हजार ८३० पैकी १३ हजार ६६६ विद्यार्थिनींचीच माहिती बँक खात्यासह नोंदविण्यात आली. त्यातही शेकडो विद्यार्थिनींचा खाते क्रमांक चुकला आहे. तर, ज्यांचे खाते क्रमांक बरोबर नोंदविले, त्यांच्या बँकेचा आयएफसी कोड चुकलेला आहे. त्यामुळे २ मार्चलाच जिल्हास्तरावर प्राप्त झालेला निधी १७ मार्च उलटल्यावरही गरजू विद्यार्थिनींच्या हाती पडलेला नाही.

जिल्हानिहाय वंचित विद्यार्थिनी
विद्यावेतनापासून वंचित विद्यार्थिनींची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : यवतमाळ ३२६, अमरावती ६१३, नागपूर ११२८, चंद्रपूर ५६१, वाशिम १८७, अकोला ३३, बुलडाणा २९२, भंडारा ५३०, वर्धा २२४, गोंदिया ३००, गडचिरोली ३११, ठाणे ५५१९, सोलापूर ३८४, सिंधुदुर्ग २७४, सातारा ४१३, सांगली १४०४, रत्नागिरी ४१६, रायगड ३७६, पुणे ११६७, परभणी ३३६, पालघर २२१, उस्मानाबाद ४१५, नाशिक ४९६, नांदेड २४१, लातूर २८८, कोल्हापूर ३०३, जालना ७७, जळगाव १८८, हिंगोली १०४, धुळे १५८, बिड २०७, औरंगाबाद ३०६, अहमदनगर ८६८.

नववीपासून पुढील शिक्षण घेण्यासाठी अपंग विद्यार्थिनींना अडचण जाऊ नये, यासाठी प्रतिमहिना २०० रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी २ हजारांचे विद्यावेतन दिले जाते.

Web Title: Delay in Divya Vidyarthi's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.