आयटीआय प्रवेश प्रक्रियेला विलंब
By Admin | Published: June 18, 2016 01:14 AM2016-06-18T01:14:57+5:302016-06-18T01:14:57+5:30
राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआय प्रवेश प्रक्रियेला यंदा दोन आठवड्यांचा उशीर झाला आहे. केवळ मुख्यमंत्र्यांच्या सहीअभावी आयटीआय प्रवेशाचा अध्यादेश अडकल्याची
मुंबई : राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआय प्रवेश प्रक्रियेला यंदा दोन आठवड्यांचा उशीर झाला आहे. केवळ मुख्यमंत्र्यांच्या सहीअभावी आयटीआय प्रवेशाचा अध्यादेश अडकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्यावर्षी ३ जूनपासून सुरू झालेली आयटीआय प्रवेश प्रक्रिया यंदा जून महिना अर्धा संपला तरी सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे.
यासंदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, अध्यादेशावर राज्यमंत्र्यांची सही झाल्याची माहिती मिळाली. मात्र केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीसाठी हा अध्यादेश रखडल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. एकीकडे मुंबईतील अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची मुदत शुक्रवारी संपली, तर दुसरीकडे आयटीआय प्रवेशाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय उशिराने सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची धावपळ होणार, हे निश्चित मानले जात आहे. (प्रतिनिधी)