एलएलबी प्रवेशासाठी मुदतवाढ विद्यार्थ्यांना दिलासा
By Admin | Published: July 6, 2017 04:53 AM2017-07-06T04:53:17+5:302017-07-06T04:53:17+5:30
एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. कारण एलएलबीचे अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. कारण एलएलबीचे अर्ज भरण्याची मुदत आता १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सीईटी सेल आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिली.
जून महिना संपून जुलै महिना उजाडला, तरीही मुंबई विद्यापीठाचा एकही निकाल जाहीर झालेला
नाही. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी येत असलेल्या तांत्रिक अडथळ््यांमुळे निकाल उशिरा लागत आहे, पण निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना एलएलबीचे अर्ज भरता येत नव्हते. एलएलबी अभ्यासक्रमांसाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया
२३ जूनपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत ५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती, पण अनेक विद्यार्थ्यांनी एलएलबीचे अर्ज भरण्याचे प्रयत्न करत होते, पण टीवायचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जात गुण भरता येत नाहीत. त्यामुळे आॅनलाइन अर्ज भरता येत नसल्याने अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.