तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामे हटवा

By Admin | Published: March 16, 2017 12:17 AM2017-03-16T00:17:20+5:302017-03-16T00:17:20+5:30

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अर्थात मोकळ्या जागांवर मोठ्या अतिक्रमणे झाल्याची कबुली देतानाच तीन महिन्यात ही अतिक्रमणे हटविण्याची सूचना आयुक्तांना देण्यात

Delete unauthorized constructions in three months | तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामे हटवा

तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामे हटवा

googlenewsNext

मुंबई : मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अर्थात मोकळ्या जागांवर मोठ्या अतिक्रमणे झाल्याची कबुली देतानाच तीन महिन्यात ही अतिक्रमणे हटविण्याची सूचना आयुक्तांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मीरा भाईंदरमध्ये खुल्या क्षेत्रावर, मनोरंजनासाठी आरक्षित मैदानांवर अतिक्रमणे वाढल्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद ठाकूर यांनी विचारला होता. या प्रकरणी मीरा भार्इंदर महापालिका प्रशासन आणि स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला. भाईंदर व पेणकरपाडा येथील शांती नगर संकुलाच्या ११ सेक्टर पैकी १,२,३,४,५,७,९ व ११ येथे अतिक्रमणे झाली आहेत. या ठिकाणचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत आहे. येथील अतिक्रमणे पाडण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही बांधकामाबाबत न्यायालयात दावे प्रलंबित असून न्यायालयाच्या आदेशानंतर पाडकाम मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, मात्र तोपर्यंत संबंधिताच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Delete unauthorized constructions in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.