मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण यंत्रणेचा बोजवारा
By admin | Published: July 15, 2016 08:32 PM2016-07-15T20:32:47+5:302016-07-15T20:32:47+5:30
आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते
धनंजय वाघमोडे /ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 15 - आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांच्या संरक्षण यंत्रणेतील पायलट गाडी (क्र. एम. एच. १३/पी. ०३९२) बंद पडली. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना ऐनवेळी वॉर्निंग गाडीचा (क्र. एम. एच. १३/बी. क्यु. ००८७) वापर करावा लागला. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यानंतर शासकीय विश्रामगृहावर विश्रांसाठी थांबले होते. सकाळी मुख्यमंत्री विश्रामगृहातून हेलिपॅडवर जाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पायलटमध्ये समोर चालणारी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरच्या गाडीचे इंजीन सुरूच झाले नाही. यामुळे तेथे उपस्थित असलेल्या ट्रॅफीक पोलीस, पोलीस हवालदार, फोटोग्राफर यांनी ही गाडी हाताने ढकलून बाजूला केली व क्र. एम. एच. १३/बी. क्यु. ००८७ ही वॉर्निंग गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यासमोर लावण्यात आली. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा ताफा हेलिपॅडकडे मार्गस्थ झाला.