दाऊदच्या हॉटेल ‘दिल्ली जायका’चा पुन्हा लिलाव?

By admin | Published: January 8, 2016 03:53 AM2016-01-08T03:53:23+5:302016-01-08T03:53:23+5:30

कुख्यात गुंड दाऊदच्या मालकीचे हॉटेल ‘दिल्ली जायका’ यशस्वी बोली लावून खरेदी करण्याचा ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांचा प्रयत्न अपयशी ठरला.

Delhi Auction Against Dawood's Hotel Auction? | दाऊदच्या हॉटेल ‘दिल्ली जायका’चा पुन्हा लिलाव?

दाऊदच्या हॉटेल ‘दिल्ली जायका’चा पुन्हा लिलाव?

Next

मुंबई : कुख्यात गुंड दाऊदच्या मालकीचे हॉटेल ‘दिल्ली जायका’ यशस्वी बोली लावून खरेदी करण्याचा ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांचा प्रयत्न अपयशी ठरला. केंद्र सरकारने केलेल्या लिलावावेळी पुकारलेली रक्कम मुदतीत ते भरू शकले नाहीत. त्यामुळे आता या हॉटेलचा पुन्हा एकदा लिलाव होण्याची शक्यता आहे.
महिन्याभरापूर्वी बालाकृष्णन यांनी या हॉटेलसाठी सर्वाधिक ४ कोटी २८ लाख रुपयांची बोली लावली होती. हॉटेलच्या लिलावावेळी ३० लाखांची ठेव जमा केली होती. महिन्याभरात बोलीची संपूर्ण रक्कम भरणे भाग होते.
याबाबत बालाकृष्णन म्हणाले, डी गँगकडून मिळालेल्या धमकीमुळे कोणताही उद्योगपती किंवा बिल्डर या प्रकल्पात मदत करण्यास तयार नसल्याने फक्त ४५ लाख रुपये जमा करता आले. यावर लिलावात ४ कोटी २७ लाखांची बोली लावणाऱ्या बुरहड यांना हे हॉटेल खरेदी करण्याचेआवाहन केले होते. मात्र त्यांनीही त्यास नकार दिला. त्यामुळे लोकांकडे पैसा आहे, मात्र त्यांच्यात हिंमत नसल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही, असा आरोप त्यांनी केला.
बालाकृष्णन यांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. लिलावानंतर हॉटेलचे शटर उघडून दाखवण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, हॉटेलची कागदपत्रे दाखवण्यातही प्रशासनाने पारदर्शकता ठेवली नाही. एका व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली माझी माहिती मागितली होती. जीवाला धोका असल्याने प्रशासनाने वैयक्तित माहिती देऊ नये, अशी विनंती केल्यानंतरही एका व्यक्तीला आपल्याबाबत माहिती देण्यात आली. मध्यंतरी आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या आणि धमकीमुळे काही दिवस घराबाहेर पडणे आणि पैसे जमा करण्यात व्यत्यय आला. त्यामुळे पैसे जमा करण्यास आणखी महिनाभराची मुदत देण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. मात्र मुदतवाढ देण्यासही प्रशासनाने नकार दिल्याचे बालाकृष्णन यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Delhi Auction Against Dawood's Hotel Auction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.