Delhi Election Results: भविष्यात नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, शिवसेना म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 01:01 PM2020-02-11T13:01:43+5:302020-02-11T13:03:57+5:30

दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

Delhi Election Results: Who is the option to Narendra Modi in the future? | Delhi Election Results: भविष्यात नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, शिवसेना म्हणते...

Delhi Election Results: भविष्यात नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, शिवसेना म्हणते...

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. 

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी साधली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील कदाचित शिवसेना ठरवेल.

पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. निवडणुकांमधूनच लोकांचं कौल मिळत असतो. त्याचा कौल आता मिळालेला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकांच्या मनात काय आहे, हे मतपेटीतून दिसेल. राजकारणात ओहोटी आणि भरती सुरूच असते. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे. परंतु सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील शिवसेना ठरवेल. पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

तसेच मोदींच्या देशद्रोह्यांसंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीनं देशद्रोहाची व्याख्या करणं म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे.

देशाच्या राजकारणाला शिवसेनेनं वेगळं वळण दिलं आहे. त्या वळणाचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. दिल्लीत आपची सत्ता उलथवण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाजपाचे दिग्गज नेते उतरवले गेले होते. एवढे सगळे दिग्गज नेते उतरवल्यानंतरही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर ते आपला कब्जा करू शकलेले नाहीत. जिंकू शकलेले नाहीत. यातच सगळ्या पुढच्या भविष्याची दिशा दिसते आहे. 

Web Title: Delhi Election Results: Who is the option to Narendra Modi in the future?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.