दिल्लीने सरकारचे पायपुसणे केलेय, 105 आमदार असूनही भाजपवर काय ही वेळ; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 11:13 AM2023-10-26T11:13:24+5:302023-10-26T11:14:00+5:30

Sanjay Raut Latest News: राम मंदिर बनत आहे. पंतप्रधान मोदी जाणार, एवढा मोठा इव्हेंट ते कसे सोडणार?  इंडिया अलायन्सला भाजप घाबरलेली आहे, असा टोला राऊतांनी लगावला. 

Delhi has wiped out the government, despite having 105 MLAs, what is the time for BJP, Pm Modi maharashtra tour; Criticism of Sanjay Raut | दिल्लीने सरकारचे पायपुसणे केलेय, 105 आमदार असूनही भाजपवर काय ही वेळ; संजय राऊतांची टीका

दिल्लीने सरकारचे पायपुसणे केलेय, 105 आमदार असूनही भाजपवर काय ही वेळ; संजय राऊतांची टीका

महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का ? ते पाहावे लागेल. सरकार बदलत आहे, राष्ट्रपती शासन लागत आहे, काही होऊ शकते. मोदी येणार, साईबाबांचे दर्शन घेणार, भाषण करणार, स्वतः ते एक बाबा आहेत, भाजप म्हणजे भाषण माफिया. त्यापासून महाराष्ट्राला सुटका दिली पाहिजे. या बेकायदेशीर सरकारच्या मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, अशी टीका उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मात्र, यावर कुठलाही तोडगा सरकारने काढलेला नाही. हा तोडगा केंद्र सरकार काढणार. या अगोदर देखील मी म्हणलो होतो की,  जरांगे यांना मोदींसमोर बसवले पाहिजे, ज्या काही मागण्या आहेत, त्या समोर बसून सांगितले पाहिजे, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात जो जुगार ते हरत आहेत, एका नैराश्यातून ते महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे पंतप्रधानांना वारंवार बोलवावे लागत आहे. देशाचे पंतप्रधान आहेत, ते मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून कुठेही जाऊ शकतात, असा टोला राऊतांनी मोदींना लगावला.

वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जात आहे. या सरकारचे दिल्लीने पायपुसणे केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्राला गेले आणि सर्व खानांना धडा शिकून आले. चहा पिऊ का? पाणी पिऊ का? हे विचारण्यासाठी तुम्हाला वारंवार दिल्लीत जावे लागते. मंत्रिमंडळाचा विस्तार राहिला बाजूला, विकास राहिला बाजूला. आम्ही गुलाम आहोत, हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही त्यांच्यावरती टीका करणार नाही. आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. आज महाराष्ट्राची प्रतिष्ठा दिल्ली चरणी आहे, अशी टीका राऊतांनी शिंदे, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर केली. 

भाजपकडे 105 चा आकडा असून काय वेळ आली आहे? हाजी हाजी करावी लागत आहे. बेकायदेशीर आणि दुसऱ्याला मंत्रिमंडळात आणावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. राम मंदिर बनत आहे. पंतप्रधान मोदी जाणार, एवढा मोठा इव्हेंट ते कसे सोडणार?  इंडिया अलायन्सला भाजप घाबरलेली आहे, असा टोला राऊतांनी लगावला. 

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला लोकांनी यावे. यापूर्वी एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास लोक उत्स्फूर्तपणे जात होते. मात्र, आज पंतप्रधान म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. हे भाजपने स्वीकारायला हवे. कोणीही त्या कार्यक्रमाला सरकारी गाडीतून जाणार नाही.  त्या गाड्यांमध्ये बसायला कोणी तयार नाही. गर्दी जमवायचा तो प्रयत्न आहे. परंतू, लोकांनी त्या गाड्या परत पाठवल्या अशी टीका देखील राऊत यांनी केली. 

Web Title: Delhi has wiped out the government, despite having 105 MLAs, what is the time for BJP, Pm Modi maharashtra tour; Criticism of Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.