१२ तासांत दिल्ली-मुंबई
By admin | Published: September 12, 2016 04:32 AM2016-09-12T04:32:55+5:302016-09-12T06:30:35+5:30
वेगवान टेरन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टॅल्गो’ची शनिवारी घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर या सुसाट टे्रनने अवघ्या बारा तासांत कापले
मुंबई : वेगवान टेरन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टॅल्गो’ची शनिवारी घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर या सुसाट टे्रनने अवघ्या बारा तासांत कापले. राजधानी एक्स्प्रेसला हे अंतर पार करण्यासाठी सोळा तासांचा अवधी लागतो.
दिल्ली येथून शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास निघालेली टॅल्गो रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईत दाखल झाली. टॅल्गो चाचणीबाबत अधिक माहिती देताना रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे संचालक विजयकुमार यांनी सांगितले की, टॅल्गोने दिल्ली ते मुंबई हे अंतर ११ तास ४८ मिनिटांत पूर्ण केले. चाचणीवेळी टॅल्गोचा वेग प्रति तास १५० किलोमीटर एवढा होता. महत्त्वाचे म्हणजे, कमी वजनाच्या डब्यांच्या कारणात्सव टे्रनला हा वेग राखणे शक्य झाले. या टे्रनच्या डब्यांची चाचपणी मे महिन्यापासून सुरू आहे. टॅल्गो ट्रेनच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आता अन्य रेल्वे मार्गांवर टॅल्गोची चाचणी घेण्याचा रेल्वे बोर्डाचा विचार आहे.
टॅल्गो ही स्पेन बनावटीची ट्रेन.
दिल्ली ते मुंबईपूर्वी मथुरा
ते पलवाल या मार्गावरही टॅल्गोची चाचणी.
३० टक्के वीजेचा कमी वापर, वजनाने हलके आणि वळणावर वेग कमी करण्याची गरज नसलेले टॅल्गोचे २५० कोच देशात वापरणार.भारतीय इंजिनला जोडून चाचणी टॅल्गोमध्ये दोन एक्झिक्युटिव्ह आणि चार चेअर कारचे कोच