CoronaVirus: डेल्टाने महाराष्ट्राची वाढली चिंता; ८८ टक्के रुग्णांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:19 AM2021-08-23T06:19:55+5:302021-08-23T06:20:17+5:30
इंडियन सार्स-कोव-२ जिनोमिक कन्सॉर्शिया (आयएनएसएसीओजी) रविवारी जारी केलेल्या ताज्या अध्ययनाने सरकार हैराण आहे; कारण जुलैत महाराष्ट्रातील ८८ टक्के रुग्णांंना बी.१.६१७.२ स्वरुपाच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.
- हरिश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना विषाणूबाधित रुग्णांची देशातील देशांतील संख्या घटत असली तरी, डेल्टा स्वरूपणाच्या विषाणूचा सातत्याने फैलाव होत असल्याने डेल्टा विषाणू गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. पूर्णत: लसीकरण झालेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे.
इंडियन सार्स-कोव-२ जिनोमिक कन्सॉर्शिया (आयएनएसएसीओजी) रविवारी जारी केलेल्या ताज्या अध्ययनाने सरकार हैराण आहे; कारण जुलैत महाराष्ट्रातील ८८ टक्के रुग्णांंना बी.१.६१७.२ स्वरुपाच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. ऑगस्टमध्येही हा कल दिसून आला. २८ प्रयोगाळांकडून करण्यात आलेल्या ५१९९६ नमुन्यांपैकी ११९६८ नुमने महाराष्ट्रातील होते. अनेक राज्यांतही हा विषाणू आढळला. विशेष म्हणजे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांवरही परिणाम करीत असल्याने आरोग्य आणि विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाने हा कार्यक्रम व्यापकस्तरावर हाती घेतला आहे.
डेल्टा विषाणूचा संसर्ग झालेल्या आढळलेल्या रुग्णांच्या नुमन्यांच्या विश्लेषणानुसार आयएनएसएसीओजीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार केरळात या विषाणूंचे ५५५४ (१०.७ टक्के), दिल्लीत ५३५४ (१०.३ टक्के), ओडिशात २५११(४.८ टक्के) आणि पंजाबमध्ये २०७१ (४ टक्के) रुग्ण आढळले. गोवा आणि हरियाणात एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना पूर्णत: लसीकरणा झालेल्यांनाही डेल्टा विषाणू आढळणे, ही चिंताजनक बाब आहे.