Delta Plus in Maharashtra: डेल्टा प्लसची लागण झालेल्या त्या २१ जणांपैकी कोणी कोरोना लस घेतली होती का? राज्याचे डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 09:54 AM2021-06-27T09:54:45+5:302021-06-27T11:57:45+5:30

Coronavirus in Maharashtra: राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे आयुक्त एन रामास्वामी यांनी सांगितले की, लवकरच डेल्टा प्लस व्हेरिअंट सापडलेल्या ५ जिल्ह्यांत लसीकरण मोहिम तीव्र केली जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, तिथे अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Delta Plus in Maharashtra: Did any of the 21 people infected with Delta Plus get the corona vaccine? State doctors said ... | Delta Plus in Maharashtra: डेल्टा प्लसची लागण झालेल्या त्या २१ जणांपैकी कोणी कोरोना लस घेतली होती का? राज्याचे डॉक्टर म्हणाले...

Delta Plus in Maharashtra: डेल्टा प्लसची लागण झालेल्या त्या २१ जणांपैकी कोणी कोरोना लस घेतली होती का? राज्याचे डॉक्टर म्हणाले...

Next

Delta Plus in India: मुंबई : इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट दरवाजा ठोठावत असताना भारतातही कोरोनाचा डेल्टा प्लस (Delta plus corona) व्हेरिअंट सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकट्या महाराष्ट्रात २१ लोकांना या व्हेरिअंटची लागण झाल्याचे समोर आले आहे (Delta plus varient in Maharashtra). महत्वाचे म्हणजे या लोकांना कोरोना लस मिळाली नव्हती. महाराष्ट्र आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, या सर्व रुग्णांची माहिती घेतली जात आहे. (nobady taken corona vaccine who infected from corona Delta plus varient in Maharashtra.)

CoronaVirus: लस घेतलेल्यांना उद्यापासून सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटची लागण झालेले जे रुग्ण सापडले आहेत, त्यांच्यापैकी एकालाही कोरोना लस देण्यात आली नव्हती. तसेच यापैकी तीन रुग्ण असे होते, जे १८ वर्षांपेक्षाही कमी वयाचे होते, जे लस घेण्यासाठी पात्र नव्हते. महाराष्ट्रात या नव्या धोकादायक व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर डेल्टा व्हेरिअंट सापडलेल्या जिल्ह्यांत मेगा लसीकरण मोहिम उघडण्याची तयारी केली जात असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अलर्ट
राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे आयुक्त एन रामास्वामी यांनी सांगितले की, लवकरच डेल्टा प्लस व्हेरिअंट सापडलेल्या ५ जिल्ह्यांत लसीकरण मोहिम तीव्र केली जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, तिथे अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 408 व्यक्तींचा कोरोना

देशभरात सध्या डेल्टा व्हेरिअंटचे ४८ रुग्ण सापडले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरीतील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. तामिळनाडूमध्ये  ९, मध्य प्रदेश ८, केरळ तीन आणि पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. 

Web Title: Delta Plus in Maharashtra: Did any of the 21 people infected with Delta Plus get the corona vaccine? State doctors said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.