सांस्कृतिक खेळांवरील बंदी उठवण्याची मागणी
By admin | Published: January 23, 2017 04:50 AM2017-01-23T04:50:02+5:302017-01-23T04:50:02+5:30
तामिळनाडूतील जलीकट्टू व राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायमस्वरूपी उठवा, या मागणीसाठी राज्यातील बैलगाडी मालक आणि तामिळ बांधवांनी
मुंबई : तामिळनाडूतील जलीकट्टू व राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायमस्वरूपी उठवा, या मागणीसाठी राज्यातील बैलगाडी मालक आणि तामिळ बांधवांनी एकत्रितपणे रविवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. केंद्रासह महाराष्ट्र आणि तामिळनाडू सरकारने या मागणीची दखल घेतली नाही, तर मुंबईतील पेटाचे कार्यालय फोडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे रामकृष्ण टाकळकर म्हणाले की, तामिळनाडूमधील संस्कृतीसाठी तेथील सेलिब्रिंटीसह राजकीय नेते आणि लोक रस्त्यावर उतरले आहे. त्याचप्रमाणे येथील नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी लोकांसोबत रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. सध्या तरी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा टाकळकर यांनी केला आहे. मात्र राजकीय नेते यापुढेही आंदोलनात दिसले नाही, तर कोणत्याही राजकीय नेत्याला गावात फिरकू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)