‘सामना’वर बंदीची मागणी चुकीची - नायडू
By Admin | Published: February 18, 2017 01:51 AM2017-02-18T01:51:53+5:302017-02-18T01:51:53+5:30
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रावर बंदी घालण्याची भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली मागणी चुकीची आहे.
पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रावर बंदी घालण्याची भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली मागणी चुकीची आहे. ‘सामना’वर बंदी घालू नये, त्यांना मोदींविरोधात जे लिहायचे ते लिहू द्यावे, अखेर जनताच मतदानातून योग्य तो निर्णय घेईल, असा घरचा आहेर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी भाजपला दिला.
महापालिका निवडणुकीच्या मतदानाअगोदर ‘सामना’वर ३ दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.मात्र आयोगाने ती फेटाळून लावली होती.