पाणीवाटप कायदा रद्द करण्याची विखेंची मागणी
By admin | Published: November 14, 2015 03:47 AM2015-11-14T03:47:17+5:302015-11-14T03:47:17+5:30
समन्यायी पाणीवाटप कायदा शेतकरीविरोधी असल्याने तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रांतिक वाद थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले़
अहमदनगर : समन्यायी पाणीवाटप कायदा शेतकरीविरोधी असल्याने तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रांतिक वाद थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले़
लोणी बुद्रूक येथे गुरुवारी दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित ग्रामसभेत ते म्हणाले, पाण्याबाबत आता सर्व जण बोलू लागले आहेत़ मात्र, हा कायदा होताना आणि पाणी जायकवाडीला जात असताना शिवसेनेचे खासदार कुठे होते?
पाणी पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करण्याचे शहाणपण त्यांना सुचले़ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकाचे वाटोळे झाल्यानंतर चुका कबूल करण्यात काय अर्थ?
सरकारने शेतकरी हिताच्या योजना बंद करून ‘मेक इन महाराष्ट्र’ ही योजना सुरू केली आहे, हे चुकीचे धोरण आहे़
जलयुक्त शिवार अभियानातून मोठा पाणीसाठा निर्माण झाला असल्याच्या वल्गना सरकार करत आहे़
मात्र, अनेक गावांतील जनतेला पिण्याचे पाणी नाही आणि पाणी असेल तर सरकारने त्याचा हिशोब द्यावा, असे विखे म्हणाले़
(प्रतिनिधी)