पैसे घेऊन दर्शन घडविण्यात मंदिर समिती सदस्याचा हात, पंढरपूर विठ्ठल मंदिरातील रॅकेट उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 08:03 PM2018-09-01T20:03:03+5:302018-09-01T20:03:29+5:30
पैसे घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडवणाऱ्या दोघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्या दोघांना न्यायालयात उभे केले असता, तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
पंढरपूर - पैसे घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडवणाऱ्या दोघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्या दोघांना न्यायालयात उभे केले असता, तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्यांची नावे कैलास डोके व विजय देवमारे असे आहेत. या प्रकरणात मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव सहभागी असल्याचे पोनि. श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले.
हैदराबाद येथील श्रीनिवासराव प्रसादराव पिट्टे (वय ५०) व त्याची पत्नी लक्ष्मी श्रीनिवास पिट्टे (दोघे रा. जयप्रकाशनगर, अमीरपेठ, हैद्राबाद) विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी गुरुवारी आले होते. यावेळी हार विक्रेते कैलास डोके यांनी त्याच्याशी भाविकांची संपर्क साधून त्यांना पैसे दिल्यास थेट विठ्ठलाचे दर्शन घडवितो असे सांगितले व त्या दोघांकडून प्रत्येकी चारशे रुपये प्रमाणे आठशे रुपये घेतले. मात्र या घडामोडींवर घडत असताना मंदिर परिसरात सुरक्षितेसाठी असलेले पोलीस कर्मचारी पोना वामन यलमार हे लक्ष ठेवून उभे होते. हैदराबाद येथील पती-पत्नी तुकाराम भवन येथून पाच घेऊन आल्यानंतर सुरक्षा कर्मचारी पोलीस नाईक यलमार यांनी त्या भाविकांना विचारणा केली यावेळी त्या भाविकांनी कैलास डोके यांनी आमच्याकडून आठशे रुपये घेतले व दर्शनाचा पास दिला असे सांगितले पो.ना. यलमार यांनी पास संदर्भात तपासणी केली असता या पासचा आदेश मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी दिला होता. व वहा दर्शन पास कैलास डोके यांनी घेतला होता. यामुळे कैलास डोके यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच देणारा केलास डोके याला पोलिसांनी शनिवारी अटक केली असून यामध्ये आणखी एक विजय देवमारे हा सहभागी असला निदर्शनास आले यामुळे दोघांना पंढरपुरात हजर केले असता त्या दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.