शेतक-यांचे भीक मांगो आंदोलन

By admin | Published: July 26, 2016 12:49 AM2016-07-26T00:49:50+5:302016-07-26T00:49:50+5:30

रिसोड तालुक्यातील प्रकार; रासायनिक औषध फवारणीमुळे जळाली झेंडूची रोपे.

Demand for farmers' demands | शेतक-यांचे भीक मांगो आंदोलन

शेतक-यांचे भीक मांगो आंदोलन

Next

मालेगाव (जि.वाशिम): रासायनिक औषधाची फवारणी केल्यानंतर तब्बल ३0 एकरात लागवड केलेल्या झेंडूची रोपे अक्षरश: जळून खाक झाली. तथापि, या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळण्यासाठी शेलगांव राजगुरे (ता. रिसोड) येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी मालेगांव येथील प्रशासकीय कार्यालयांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवार, २५ जुलै रोजी भीखमांगो आंदोलन केले.
शेलगाव राजगुरे येथील सहा युवा शेतकर्‍यांनी ३0 एकर क्षेत्रात झेंडूच्या रोपांची लागवड केली होती. यादरम्यान, रिसोड येथील एका कृषी सेवा केंद्रातून खासगी कंपनीचे आंतरप्रवाही फॉलीकेअर या रासायनिक औषधाची फवारणी केल्यास झेंडूचे पीक बहरते, अशी माहिती मिळाल्याने संबंधित शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये या रासायनिक औषधीची फवारणी केली. मात्र, फायदा होण्याऐवजी झेंडूची सर्व रोपे जळून खाक झाली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी हा प्रकार रिसोड पंचायत समितीकडे कथन केला. मात्र, न्याय मिळवून देण्याऐवजी संबंधित शेतकर्‍यांना प्रशासनाने न्यायालयीन लढाई लढण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात चक्क भीखमांगो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.

Web Title: Demand for farmers' demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.