दिलासादायक! राज्यातील भारनियमन आटोक्यात, शनिवारी २४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 09:17 PM2022-04-23T21:17:55+5:302022-04-23T21:18:09+5:30

Load Shedding In Maharashtra: ऐन कोळसा टंचाईत विजेची वाढती मागणी व उपलब्धतेमधील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनास यश येत असून, मागणीएवढा विजेचा पुरवठा केला जात आहे.

Demand for 24,877 MW electricity on Saturday | दिलासादायक! राज्यातील भारनियमन आटोक्यात, शनिवारी २४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी

दिलासादायक! राज्यातील भारनियमन आटोक्यात, शनिवारी २४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी

Next

मुंबई - ऐन कोळसा टंचाईत विजेची वाढती मागणी व उपलब्धतेमधील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनास यश येत असून, मागणीएवढा विजेचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे राज्यात विजेचे भारनियमन आटोक्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिल्याचेही महावितरणने म्हटले आहे.

महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. कोणत्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून व कोणत्या स्रोताकडून प्रत्येक तासाला किती वीजपुरवठा उपलब्ध होत आहे, याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. मागणीएवढी वीज उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागणी व उपलब्धततेत तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रयत्नांमुळे भारनियमनाचे योग्य व्यवस्थापन करून विजेची उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात यश येत आहे. भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून तासागणिक आढावा घेतला जात आहे.
 
शनिवारी किती मागणी; कोणाकडून किती वीज मिळाली ?
२४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी होती.
महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३८० मेगावॅट
केंद्राकडून ६१०२ मेगावॅट
उरण गॅसमधून २१३ मेगावॅट
कोयना जलविद्युत प्रकल्पातून ११३४
सीजीपीएलकडून ६२२ मेगावॅट
जीएमआरकडून २०० मेगावॅट
अदानीकडून २९५१ मेगावॅट
रतन इंडियाकडून १२०० मेगावॅट
पॉवर एक्सचेंजमधून ४२६ मेगावॅट
साई वर्धाकडून २४० मेगावॅट
बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १२२६ मेगावॅट
राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून ९१५ मेगावॅट
पवन ऊर्जा प्रकल्पांकडून ८५ मेगावॅट
सहवीज निर्मितीतून ९९६
लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून २२७ मेगावॅट
रिअल टाइम मार्केटमधून ४२४ मेगावॅट

Web Title: Demand for 24,877 MW electricity on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.