‘प्लँचेट’ प्रकरणाच्या चौकशीची मागणी

By admin | Published: July 9, 2014 01:40 AM2014-07-09T01:40:35+5:302014-07-09T01:40:35+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यासाठी ‘प्लँचेट’सारख्या अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप होत असेल, तर तो अत्यंत गंभीर आहे.

Demand for inquiry of 'Planchet' case | ‘प्लँचेट’ प्रकरणाच्या चौकशीची मागणी

‘प्लँचेट’ प्रकरणाच्या चौकशीची मागणी

Next
सातारा : ज्यांनी आयुष्यभर आत्मा, पुनजर्न्म या संकल्पनांना विरोध केला, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यासाठी ‘प्लँचेट’सारख्या अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप होत असेल, तर तो अत्यंत गंभीर आहे. गृहखात्याने तितक्याच गांभीर्याने त्याची दखल घ्यावी आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती पोलीस महासंचालकांकडे करणार आहे.
अंधश्रद्धा निमरूलन चळवळीतील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गेल्या वर्षी 2क् ऑगस्ट रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहा महिने उलटूनही मारेक:यांर्पयत पोचण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. आता या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या तपासासाठी ‘प्लँचेट’ करून डॉ. दाभोलकर यांच्याच आत्म्याला पाचारण करण्यात आले आणि तपासाची दिशा ठरविण्यात आली, असा आरोप करणारा वृत्तांत एका नियतकालिकात प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी तातडीने हा आरोप फेटाळला आहे. मात्र, या आरोपाची शहानिशा होऊन सत्य महाराष्ट्रासमोर आले पाहिजे, अशी भूमिका ‘अंनिस’ने घेतली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जीवनपट आणि त्यांचे विचार सर्वानाच माहीत आहेत. अशा व्यक्तीच्या हत्येचा तपास वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणा:या अधिका:यानेच केला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Demand for inquiry of 'Planchet' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.