मुंडेंकडून न्यायालयीन चौकशीची मागणी
By Admin | Published: August 4, 2016 04:31 AM2016-08-04T04:31:17+5:302016-08-04T04:31:17+5:30
महाड पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.
मुंबई : महाड पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. तसेच या दुर्घटनेतील मनुष्यहानीला शासकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने पुलाच्या दुरुस्ती-देखभालीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विरोधी पक्षातील सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना देऊन चर्चेची मागणी केली होती. इतका कमकुवत पूल वाहतुकीस खुला कसा ठेवण्यात आला, त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले होते का, असे अनेक प्रश्न उपस्थित करत संबंधित पुलाबाबत चुकीचे निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.