‘कोल्हापूर बंद’ची आग्रही मागणी--टोलचा प्रश्न

By admin | Published: May 20, 2015 12:50 AM2015-05-20T00:50:47+5:302015-05-20T00:51:05+5:30

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याबाबत आज निर्णय सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची पुन्हा बैठक होणार

The demand for 'Kolhapur Bandh' - the question of toll | ‘कोल्हापूर बंद’ची आग्रही मागणी--टोलचा प्रश्न

‘कोल्हापूर बंद’ची आग्रही मागणी--टोलचा प्रश्न

Next



कोल्हापूर : निवडणुकीच्या काळात कोल्हापुरात येऊन प्रचारसभेत कोल्हापूरला टोलमुक्त करण्याची ग्वाही देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी ‘कोल्हापूर बंद’ ठेवून त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करावे, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. एन. डी. पाटील होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी कोणता कार्यक्रम घ्यायचा, हे ठरविण्यासाठी आज, बुधवारी दुपारी चार वाजता बैठक घेण्यात येणार आहे.
टोलविरोधातील आंदोलनात आघाडीवर असणारे नेते आज सत्तेत गेल्यामुळे त्यांनी जनतेला दिलेले आश्वासन पाळावे, अशी अपेक्षा अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली. जर मुख्यमंत्र्यांना ‘कोल्हापूर बंद’सारख्या आंदोलनाला सामोरे जायचे नसेल, तर मुंबईत घोषणा करूनच त्यांनी

भाजप नेत्यांची भूमिका बदलली
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी ‘कोल्हापूर बंद’ ठेवण्याच्या मागणीला भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, रामभाऊ चव्हाण यांनी थेट विरोध दर्शविला. मु्ख्यमंत्री व पालकमंत्री यांनी टोलला पर्याय पुढे आणले असले तरी अंतिम निर्णय काही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्याशी सन्मानाने चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन महेश जाधव यांनी दिले; तर वारंवार होणाऱ्या ‘कोल्हापूर बंद’ला जनता आता कंटाळलेली आहे.
जनतेचा हा विरोध लक्षात घेता असा कोणताही निर्णय घेऊ नये, असे रामभाऊ चव्हाण म्हणाले; परंतु पूर्वी आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या या दोन नेत्यांची बदललेली भूमिका पाहून उपस्थितांनी त्यांची खिल्ली उडविली. त्यांच्या भाषणात काहींनी अडथळे आणण्याचाही प्रयत्न केला. कोल्हापूरला

प्रकल्पच रद्द करावा
रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीचे सदस्य आर्किटेक्ट राजू सावंत यांनी कोल्हापूरचा रस्ते विकास प्रकल्पच रद्द करावा आणि ‘आयआरबी’ची चौकशी करावी, अशी मागणी केली. ते म्हणाले की, ‘आयआरबी’ने रस्ते करताना नियम व अटींचा भंग केला आहे. त्यांनी एकही काम अटीनुसार केलेले नाही; त्यामुळे प्रकल्प रद्दच केला पाहिजे. आता ज्या कंपनीकडे मूल्यांकनाचे काम सोपविले आहे, त्यातही अनेक प्रकारच्या त्रुटी


धनंजय महाडिक
कृती समितीबरोबरच
राष्ट्रवादी कॉँग्रेस पहिल्यापासूनच टोलविरोधी आंदोलनात सहभागी आहे. त्यामुळे खासदार धनंजय महाडिकसुद्धा कृती समितीसोबत आहेत, असे आर. के. पोवार यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक राजेश लाटकर यांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचे खासदार महाडिक यांचे पत्र कृती समितीकडे सुपूर्द केले. असून, त्या दूर करण्यास सुचविले आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत तरी मूल्यांकनाचे काम होणार नाही. यावे, असेही काही वक्त्यांनी सुचविले. (प्रतिनिधी)

पानसरेंना श्रद्धांजली वाहावी
राज्य सरकारने ‘टोलमुक्त कोल्हापूर’ची घोषणा करून अ‍ॅड. गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन नगरसेवक राजेश लाटकर यांनी केले. यावेळी लालासाहेब गायकवाड, भगवान काटे, दीपा पाटील, पद्माकर कापसे, अनिल घाडगे, संदीप घाटगे, राजेंद्र चव्हाण, प्रशांत चिटणीस, तौफिक मुल्लाणी, उदय लाड, आर. डी. पाटील, सुभाष कोळी, शिवाजीराव परुळेकर, बजरंग शेलार, शरद मिराशी, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सुजाता पाटील, यांची भाषणे झाली. स्वागत निवासराव साळोखे यांनी केले. प्रा. जे. एफ. पाटील उपस्थित होते.

Web Title: The demand for 'Kolhapur Bandh' - the question of toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.