नायगाव ते पांडेश्वर रस्तादुरुस्तीची मागणी
By Admin | Published: May 18, 2016 01:19 AM2016-05-18T01:19:31+5:302016-05-18T01:19:31+5:30
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव ते पांडेश्वर या रस्त्याची दुरवस्था झाली
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव ते पांडेश्वर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नायगाव ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चौंडकर यांनी केली आहे.
एक जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर नावाने ख्यातकीर्त पावलेले पुरातन जागृत देवस्थान आहे. सर्व प्रांतांमधून असंख्य भाविक श्री सिद्धेश्वराच्या दर्शनास येतात. तसेच पांडेश्वर येथील श्री महादेव हेदेखील पुरातन देवस्थान आहे. अनेक भाविक व नागरिक नायगाव ते पांडेश्वर याच रस्त्याचा वापर करतात.
महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला नायगाव येथील असंख्य नागरिक पांडेश्वर या ठिकाणी रात्री ते पहाटेच्या दरम्यान पांडेश्वर या ठिकाणी
चालत जाऊन तेथील कऱ्हा नदीचे पाणी श्री सिद्धेश्वरास घेऊन येतात. दर सोमवती अमावास्येला नायगाव येथील नागरिक चालत श्री सिद्धेश्वराची पालखी घेऊन पांडेश्वरला जातात.
यासाठी नायगाव ग्रामपंचायत व नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यालयात दिले असल्याची माहिती नायगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत विष्णू चौंडकर यांनी दिली.