भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

By अतुल कुलकर्णी | Published: November 20, 2018 03:43 AM2018-11-20T03:43:47+5:302018-11-20T03:44:48+5:30

हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या.

 Demand for a record Rs 20,326 crore by the BJP government | भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

Next

मुंबई : हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. यात विविध पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत भूसंपादन, पुनर्वसन व सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाची बिले देण्यासाठी सगळ्यात जास्त
म्हणजे तब्बल ३ हजार कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे.
मार्चमध्ये सरकारने ३ लाख ३८ हजार ८१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर, पावसाळी अधिवेशनात ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. भाजपा शिवसेनाचा कार्यकाळ आॅक्टोबर, २०१९ला संपणार आहे. त्यामुळे मार्च, २०१९ला पूर्ण अर्थसंकल्प मांडता येणार नाही आणि मांडला तरी त्याचा वापर पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ करता येणार नाही, म्हणून या हिवाळी
अधिवेशनात जास्तीतजास्त निधी देण्याचे नियोजन केल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.

मदतीसाठी २,२०० कोटी
खरीपात दुष्काळ घोषित केल्यामुळे मदतीचे वाटप करण्यासाठी २२०० कोटी, महावितरण कंपनीच्या कृषी व यंत्रमागधारक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलतीपोटी २००० कोटी, हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामांसाठी १,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत १,००० कोटी, इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्या
मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी ७०० कोटी, सहकारी संस्थांसाठीच्या अटल अर्थसाहाय्य योजनेसाठी
५०० कोटी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ४२५ कोटी, नगरपरिषदांना विविध कामांसाठी ३२० कोटी अशा तरतुदी केल्या आहेत.


अर्थसंकल्पाच्या नियोजनाचा अभाव, विभागांवर मंत्र्यांचे, सचिवांचे दुर्लक्ष यामुळे पुरवणी मागण्या वाढतात, असा आक्षेप विरोधी पक्षात असताना भाजपाचे नेते करत होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या बोलण्याचा विसर पडला आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते

कागदावर आकडे दाखवायचे आणि प्रत्यक्षात कामांना कात्री लावायची, ही जनतेची फसवणूक आहे. मार्च २००९ मध्ये आणखी एकदा पुरवणी मागण्या मांडण्याची संधी वित्तमंत्री सोडतील, असे वाटत नाही. - जयंत पाटील, माजी वित्तमंत्री

काँग्रेस, राष्टÑवादीने यापेक्षा जास्त मागण्या मांडल्या होत्या. आम्ही दुष्काळावर मात व शेतकºयांना
मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. म्हणून या मागण्या आहेत. - सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री.

Web Title:  Demand for a record Rs 20,326 crore by the BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.