उमरग्यातील रोकड जप्तीप्रकरणी सहकारमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By Admin | Published: November 18, 2016 01:16 PM2016-11-18T13:16:09+5:302016-11-18T16:04:49+5:30
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उमरगा येथे जप्त करण्यात आलेल्या 91.5 लाख रुपयांची रोकड देशमुख यांची असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 18 - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उमरगा चौरस्ता येथे नगरपालिकेच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत एका जीपमधील 91 लाख 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड लोकमंगल समुहाची असल्याची माहिती मिळत आहे. गंभीर बाब म्हणजे यात चलनातून रद्द करण्यात आलेल्या 1000 रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या आहेत. सुभाष देशमुख या समुहाचे अध्यक्ष असल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, लोकमंगलतर्फे करण्यात आलेल्या खुलाशावर निवडणूक आयोगाचे समाधान झालेले नाही. त्यामुळे याप्रकरणी 'लोकमंगल'च्या व्यवस्थापकांनी सादर केलेला खुलासा दिल्लीतील मुख्य रजिस्ट्रारकडून तपासण्यात येणार आहे. सोबत लेखी खुलासा आणि जप्त करण्यात आलेली रक्कम सहकार विभागाच्या उपनिंबधकाकडून थर्ड पार्टी ऑडिट करुन घेण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी यांनी सांगितले.
या प्रकरणी लोकमंगलच्या व्यवस्थापकांनी सादर केलेला खुलासा दिल्ली येथील मुख्य रजिस्ट्रॉरकडून तपासून घेण्यात येणार आहे. याबरोबरच लेखी खुलासा व सदर रकमेचे सहकार विभागाच्या उपनिबंधकाकडून थर्ड पार्टी ऑडिट करुन घेण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी यांनी सांगितले.
दरम्यान, नोटाबंदी निर्णयानंतर 8 दिवस 91 लाख 50 हजार रुपयांच्या जुन्या नोटा समुहाच्या मल्टिस्टेटमध्ये ठेवल्याचे, असमाधानकारक लोकमंगलकडून मिळाल्याने पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत जप्त केलेली रोकड कोषागार कार्यालयातच जमा राहणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले आहे.
Osmanabad (Maha): Rs 91.5 lakh in cash seized from a vehicle that allegedly belongs to Subhash Deshmukh; Opposition demands his resignation. pic.twitter.com/JnZlbcSHt3— ANI (@ANI_news) 18 November 2016