शहरातील टँकरच्या मागणीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 12:39 AM2017-03-03T00:39:13+5:302017-03-03T00:39:13+5:30

शहरामध्ये सोसायट्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली

Demand for tanker demand in city doubled | शहरातील टँकरच्या मागणीत दुपटीने वाढ

शहरातील टँकरच्या मागणीत दुपटीने वाढ

Next


पुणे : शहरामध्ये सोसायट्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात न उतरता कागदावरच राहिली असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा मोठ्या सोसायट्या तसेच वस्ती भागाला अपुरा पडू लागला आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी शहरातील पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुंबईमध्ये कालवा समितीची बैठक झाली होती. या बैठकीत शहराला दररोज १३५० एमएलडी पाणी देऊन दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र १३५० एमएलडीइतक्या पाण्यामध्ये संपूर्ण शहराला दोन वेळा पाणी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून त्याच वेळी स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. केवळ पेठांचा काही भाग वगळता इतरत्र एक वेळच पाणी दिले जात आहे.
उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते, त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वाढतात. मात्र धरणसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. जानेवारी महिन्यापर्यंत शहरातून प्रतिदिवस सरासरी १६० टँकर घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या २१० वर पोहोचली, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ३३५ टँकर दररोज लागतात. सोसायट्यांबरोबरच मोठे हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, हॉस्टेल यांच्याकडून टँकरची मागणी वाढली आहे. महापालिकेच्या जलकेंद्रातून पाणी उचलणाऱ्या टँकरचालकांनी सोसायट्या व वस्ती भागाला प्राधान्याने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात या व्यावसायिक कारणासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
वडगावशेरी, चंदननगर, खराडी, टिंगरेनगर, धानोरी, बावधन, बाणेर, पाषाण आदी भागांमधील सोसायट्या व वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगर रस्ता, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी आदी भागाला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येत आहे. मार्च २०१७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र शेतकऱ्यांचे पुनर्वसन या प्रश्नावरून भामा आसखेड पाइपलाइनचे काम रखडले आहे. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी या भागातील नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चार जलकेंद्रांवर टँकर भरणा
महापालिकेच्या पर्वती, चतु:शृंगी, वडगावशेरी, रामटेकडी, पद्मावती आदी भागाला ४ जलकेंद्रांवरून टँकरचालकांना पाणी उपलबध करून दिले. महापालिकेकडून एका टँकरच्या पाण्यासाठी ४५० रुपये शुल्क आकारले जाते. टँकरचालकांकडून १२०० ते १४०० रुपयांमध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. महापालिकेव्यतिरिक्त २०० खासगी बोअर, विहीरमालकांकडून टँकरसाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यांच्याकडून १२५ ते १५० रुपये एका टँकरमागे घेतले जातात.उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते, त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वाढतात. मात्र धरणसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. जानेवारी महिन्यापर्यंत शहरातून प्रतिदिवस सरासरी १६० टँकर घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या २१० वर पोहोचली, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ३३५ टँकर दररोज लागतात. टॅँकर चालकांनी मनमानी पद्धतीने पाण्याची विक्री सुरू केली असल्याच्या तक्रारी आहेत.
>मोठ्या हॉटेलकडून सर्वाधिक मागणी
शहरातील फाइव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलना नेहमी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. उन्हाळा सुरू होताच त्यांच्याकडून पाण्याच्या टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर मॉल्स, हॉस्टेल, आयटी कंपन्या यांनाही टँक रची आवश्यकता भासत आहे.

Web Title: Demand for tanker demand in city doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.