कर्जमाफीची मागणी करीत सेनेचा सरकारवर हल्लाबोल
By Admin | Published: July 16, 2015 02:12 AM2015-07-16T02:12:41+5:302015-07-16T02:12:41+5:30
संकटात असलेल्या शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.
मुंबई : संकटात असलेल्या शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.
गेले दोन दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे अनेकदा कामकाज बंद पाडलेले असताना आता शिवसेनेदेखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील, सुभाष साबणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपाचे अनिल गोटे यांनी या चर्चेला सुरुवात केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीने कर्जमाफीसाठी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना आता त्यांच्या भूमिकेला आज एकप्रकारे पाठिंबा देत शिवसेनेने सरकारची कोंडी केली आहे.
गुुलाबराव म्हणाले, राणा भीमदेवी थाटात शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करीत आपण सत्तेवर आलो. शेतकऱ्यांनी निवडून दिले म्हणूनच युतीचे सरकार आले, याचा विसर पडू देऊ नका. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांनी पदरमोड करु न शेतात टाकलेले बियाणे वाया गेले आहे. शेतकरी आज सरकारकडे डोळे लावून बसला असून त्या शेतकऱ्यांना सरकार मदत देणार की नाही.