शिवसेना-भाजपा वादावर दानवेंची सावध भूमिका
By admin | Published: June 24, 2016 08:08 PM2016-06-24T20:08:18+5:302016-06-24T20:08:18+5:30
गेला आठवडाभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आणि भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्यांवर सामना आणि मनोगतमधून टीका केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - गेला आठवडाभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आणि भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्यांवर सामना आणि मनोगतमधून टीका केली आहे.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी - शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांविषयी बोलताना आदरभाव व्यक्त केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.
कोण्या एखाद्याने वर्तमानपत्रात एखादी बातमी प्रसिद्ध केली म्हणून ते पक्षाचे मत होत नाही. वर्तमानपत्राला स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे मत व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा.
(शिवसेनेला शहाणपण शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा)
राज्यातील सरकार पाच वर्षे चालणार आहे. गेली पंचवीस वर्षे आमची नैसर्गिक मैत्री आहे. हे सरकार चालावे अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे व जनतेने तसा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काल सूचना दिल्या आहेत. शिवसेनेनीही तशा सूचना द्याव्या असे ते म्हणाले.