दागिने ऐपतीचं प्रदर्शन !
By admin | Published: January 19, 2016 08:17 PM2016-01-19T20:17:18+5:302016-01-19T22:09:50+5:30
पीटर एल. बर्नस्टाइन या अर्थशास्त्रीनं आपल्या ‘द पॉवर ऑफ गोल्ड- द हिस्टरी ऑफ अॅन ऑब्सेशन’ या नव्या ग्रंथात (प्रसिद्धी 2000) भारतीयांच्या सुवर्णविषयक आगळ्या दृष्टिक ोनाचा विशेष उल्लेख केला आहे.
Next
>२१व्या शतकाचा उंबरठा ओलांडण्याच्या संक्रमणावस्थेत साक्षेपी संपादक या नात्याने लोकमत परिवाराचा भाग बनलेल्या अरूण टिकेकरांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. टिकेकरांनी लोकमतमध्ये लिहिलेले निवडक लेख.
टिकेकरांनी लोकमतच्या मंथन पुरवणीत १० जुलै २०११ मध्ये लिहिलेला खालील लेख.
दागिने ऐपतीचं प्रदर्शन !
साेन्याचे नानाविध अलंकार
अंगावर मिरवण्याची इच्छा
तमाम मानवजातीत आढळते.
संस्कृती-संवर्धनाच्या पाय-या
ओलांडत गेलेल्या समाजात अलंकार थोडे;
पण ठसठशीत असण्याची काळजी घेतली जाते.
पीटर एल. बर्नस्टाइन या अर्थशास्त्रीनं आपल्या ‘द पॉवर ऑफ गोल्ड- द हिस्टरी ऑफ अॅन ऑब्सेशन’ या नव्या ग्रंथात (प्रसिद्धी 2000) भारतीयांच्या सुवर्णविषयक आगळ्या दृष्टिक ोनाचा विशेष उल्लेख के ला आहे. भारतीयांच्या लेखी सोनं म्हणजे जंगम (सुटसुटीत, एका ठिकाणाहून दुस:या ठिकाणी सहजगत्या वाहून नेण्यासारखी, पोर्टेबल) मालमत्तेचा सर्वात लोक प्रिय प्रकार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. मोटरगाडी, रेफ्रि जरेटर, रंगीत टेलिव्हिजन घेण्यापूर्वी इथले जन प्रथम सोनं खरेदी क रण्याचा विचार क रतात, असं त्याचं निरीक्षण त्यानं नोंदवलं आहे. म्हणूनच भारत हा अखिल जगातला सर्वाधिक सोनं खरेदी क रणा:यांचा देश आहे, यात शंका नाही. मागं एक दा (जानेवारी 1999 मध्ये) लंडनच्या ‘द इक ॉनॉमिस्ट’ या विश्वविख्यात साप्ताहिकानं भारतीयांच्या सोनं खरेदी क रण्याच्या अर्निबध लालसेचा उल्लेख क रू न आजमितीस भारतात नऊ हजार टन तरी सोनं असल्याचा अंदाज व्यक्त के ला होता. यातलं बरचसं सोनं दागिन्यांच्या रू पात घराघरांत आहे, हे उघड आहे. कि त्येक गृहिणींची संपत्ती ही फ क्त सोन्याच्या दागिन्यांच्या
रू पात आहे, असंही म्हणता येईल. शेजा:या-पाजा:यांशी स्पर्धा हा मूळ हेतू; पण ‘अडीअडचणीला सोनंच उपयोगी पडणार ही जाहीर भूमिका! सोन्याच्या रू पात के लेली गुंतवणूक ही ‘मृतवत गुंतवणूक (डेड इन्व्हेस्टमेंट) आहे, असं अर्थतज्ज्ञांनी कानीक पाळी ओरडून सांगितलं, तरी भारतीय जनमानसावर त्याचा परिणाम होणं असंभव!
असो. या सोन्याचे नानाविध अलंकार क रू न ते अंगावर मिरवण्याची इच्छा तमाम मानवजातीत असते. संस्कृ ती-संवर्धनाच्या पाय:या ओलांडत गेलेल्या समाजात अलंकार थोडे; पण ठसठशीत असण्याची काळजी घेतली जाते. भारतीयांचं अलंकारआ भूषणांचं वेड अंमळ अधिक च आहे आणि ते प्राचीन काळापासून आहे. ग्रीक इतिहासकारांनीही
भारतीयांच्या अलंकारप्रियतेचा उल्लेख के ला आहे. स्त्रिया, पुरु ष, मुलं यांचे अलंकारही भिन्न. सौंदर्यक ल्पना बदलली, की अलंकारही बदलतात. प्राचीन काळात भारतातील सोनं, मोती, रत्नं यांची मुबलक ता या अलंकार-प्रियतेला कारणीभूत झाली असावी. दुसरंही एक समाजशास्त्रीय कारण दिलंजातं. पाश्चिमात्य देशातल्या थंड हवामानामुळे तेथील नागरिकांना सर्वाग झाकावं लागतं. भारत उष्ण क टिबंधीय देश. अंग बरंचसं उघडं ठेवण्याची इथं पद्धती. मग उघडय़ा अंगावर दागिने लेवून ते झाक ण्याची पद्धत रू ढ झाली असावी, असा अंदाज व्यक्त के ला जातो. प्राचीन काळी समर्थ-सक्षम मंडळी आपल्या गायी-हत्ती-घोडय़ांना अलंकारांनी सजवत म्हणो! तर अलंकाराचे चार प्रकार सांगितले जातात - 1) अवेध्य-कुं डल, कि रीट वगैरे 2) बंधनीय-फु लं, गजरे इ. 3) क्षेप्य-नूपुर, वलय इ. आणि 4) आरोप्य- मोती-मणी यांच्या माळा इत्यादी. ‘भारतीय संस्कृ तिक ोशा’त वैदिक साहित्यात आढळणारी अलंकारांची नावं दिली आहेत. ते असे - ‘ऋग्वेदांत - अंज, अंजी, अरंकृ त, अरंकृ ती, आनूक ,
ओपश, कर्णशोभन, कुरीर, कृशन, कृशनिन, खादी,
निष्क , न्योचनी, पुंडरीक , पुष्कर, प्रभपन, बर्हन,
भूपन, मणी, रत्न, रुक्म, रुक्मिन्, ललामि, वरिमत्,
व्यंजन, विभूषण, हातपत्र, शिंबल, सुनिष्क , स्तुका,
स्रज्, हिरण्ययी, हिरण्यशिप्र, हिरमित् इत्यादी. तर
‘तैत्तिरीय संहिते’त पुंडरीक स्रज (सुवर्ण क मलांची
माला), पुष्क र, प्रवर्त, प्राकाश, भोग, मणी, रत्न, स्रज्
इत्यादी. ‘अथर्ववेदांत’ अंजी, ओपश, कु म्ब (डोक्यावर
घालायची जाळी), कुरीर, कृशन, जीवभोजन
(अंजन), देवांजन, नलंद, निष्कग्रीव, पुंडरीक , पुष्म,
प्रसाधन, मधूलक , रुक्मन्, ललाम, ललामगू,
ललाम्य, सीमन्, सुरु क्म, सुस्र, स्रज्, स्वेदांजी,
हरित्स्रज्, हिरण्यज, हिरण्यस्रक , हैरण्य इत्यादि नावे
आहेत. तर संहितेवर वा्मयात काही अन्य नावांची
भर आहे-प्राकाश, फ ण, लोहमणी, नियुक्ता, स्थागर
इत्यादि.
या इतक्या अलंकारातील काहींची ओळख पटते;
पण बहुतांश अनोळखीच वाटतात. त्यांची ओळख
दागिने घडवणा:यांना पटली, तर महिलांना हे जुने
दागिने नव्या डिझाईन’चे म्हणून पटवण्यात अडचण
येणार नाही. ऋग्वेदातल्या ‘खादी’ या अलंकाराबद्दल
कु तूहल वाटतं. वास्तविक हा खादी साखळ्या, क डे,
तोडे वा अंगठी या अर्थाचा शब्द! या वैदिक
काळातला रुक्म नावाचा सुवर्णालंकार म्हणजे एक
वतरुळाकार सुवर्णपदक . सूर्याला ‘दिवोरू क्म’ म्हणजे
आकाशाचं सुवर्णपदक म्हटलं आहे.
ऋग्वेदातही आजसारखी निरनिराळी रत्नं ही
ग्रहांची प्रतीकं मानली गेली. गुरू चा पुण्यराग, शनीचा
नीलमणी, ग्रहांची बाधा होऊ नये, झाल्यास ती
नाहीशी व्हावी म्हणून त्या-त्या रत्नांना सुवर्णाच्या
अंगठीत, हारात बसवून ते अलंकार वापरले जात.
आजही ती परंपरा जिवंत आहे. बौद्ध काळात मोत्यांचा
वापर अधिक प्रमाणात होता. नागमुद्रा हे प्रत्येक
मोत्यात गुंफ लेलं असल्याचं आढळतं.
सर्वाधिक अलंकार राजघराण्यातल्या स्त्रियांनी
वापरणं हे स्वाभाविक च होतं. आभूषण-प्रकारांत
मस्तकाभरणं, क र्णभूषणं, नासिकाभूषणं, कं ठभूषणं,
अंगुलिभूषण, क टिभूषणं, चरणालंकार,
सौभाग्यालंकार, असे ‘आपादमस्तक ’ कि ती तरी
असत, आजही वेगळ्या किं वा त्याच नावानं ते प्रसिद्ध
आहेत. काही वापरात नसले, तरी नावं पार विस्मृतीत
गेलेली नाहीत-उदाहरणार्थ- बाळी, बुगडी, भोक रं,
कु डय़ा, नथ, चमकी, कं क ण, मेखला, किं कि णी
(पैंजण), नूपुर वगैरे; पण ही नावं वेदोत्तर काळातली.
तीही वाचली कारण म्हणी आणि लोक गीतांत बांधली
गेली म्हणून!
वेदोत्तर काळातल्या राजस्त्रिया वापरत ते
अलंकारही भारदस्त आणि त्यांची नावही काव्यात्म
आणि बहारदार शिखापाश, शिखाजाल, चूडामणी,
मक रिका, मुक्ताजाल, वेणीगुच्छ, ललाटतिलक ,
क र्णवलय, दंतपत्र, क र्णपूर! आहेत की नाही संस्कृ त
काव्य-प्रतिभेला साजीशी?
एकू ण काय, तर स्त्री-पुरु षांच्या तसंच
आबालवृद्धांच्या अंगावर दागिने असणं हा ऐपत
दाखवण्याचा प्रकार होता; पण नंतरचा कालखंड
असा आला की, पेशवाईच्या अंतार्पयत पुन्हा
दागिन्यांना महत्त्व आलं. मुलूखगिरीत मिळालेली सत्ता
आणि सत्तेबरोबर आलेली संपत्ती यामुळे मराठी
जनांची ऐपत वाढत गेली. त्यात क र्नाटक , गुजरात,
माळवा, बुंदेलखंड, दिल्ली, आग्रा, बंगाल इत्यादी
प्रांतात मराठमोळ्या मंडळींचा संचार झाल्यामुळे
तेथील अलंकारांची ओळख होत जाऊ न नवनवीन
घाट उचलले गेले. आभूषणांबाबत महाराष्ट्र
उत्क र्षाला पोहोचला. ही परिस्थिती पेशवाई बुडेर्पयत
टिक ली. पहिले तीन पेशवे- बाळाजी विश्वनाथ,
बाजीराव (पहिला), नानासाहेब यांच्या कारकि र्दीत
कि त्येक नवे दागिने रू ढ झाले, त्याचप्रमाणो माधवराव,
रघुनाथराव, नारायणराव, आनंदीबाई, बाजीराव
(दुसरा) यांच्या वेळीही स्त्री-पुरु षांनी अंगावर
घालावयाच्या दागिन्यांची रेलचेल झाली, असं वा. कृ .
भावे यांनी ‘पेशवेकालीन महाराष्ट्र’ या आपल्या
अधिकारी ग्रंथात लिहिलं आहे. हे सांगतानाच भावे
यांचे भाष्यही खूपच बोलकं आणि प्रत्ययकारी आहे.
त्यांनी लिहिलं आहे, ‘‘..संपत्तीच्या विकारांचा सोस
वाढत-वाढत देव्हा:यातील व देवालयातील देव-
देवताही सोन्या-चांदीच्या व हि:या-माणकांच्या
बनविण्यात थोरपणा वाटू लागला. श्रीमंत क ोण? तर
तो आपलं ऐश्वर्य वेळी-अवेळी प्रक ट क रतो तो, अशी
व्याख्या के ल्यास ती त्या काळातील श्रीमंतांना पूर्णपणो
लागू पडेल.’’ आज दोनशे-अडीचशे वर्षानंतर पुन्हा
तशीच परिस्थिती आजूबाजूला दिसते, याचं आश्चर्य
वाटतं. ऐतिहासिक लेखसंग्रहात पेशव्यांक डून
वेळोवेळी झालेल्या दागिन्यांच्या मागण्यांविषयीच्या
कागदपत्रंविषयी वा. कृ . भाव्यांनी लिहिलं आहे.
त्यातलं एक तर विशेषच आहे. भाव्यांनी उद्धृत
के लेल्या एका ऐतिहासिक लेखसंग्रहात (खंड-5)
मध्ये लिहिलं आहे‘‘
नारो शंक र वारला तेव्हा त्याचा मुलगा
रघुपतराव याजक डे कारभारी नाना व सखाराम बापू
यांनी सरदारी कायम के ली. त्याबद्दल सरकारांत
नजराणा घेतला. त्यामध्ये पक्के सव्वादोन मण सोने
आले. त्यापैकी चौरंग एक (सोन्याचा), क मल एक
(सोन्याचे), संपुष्टक एक (सोन्याचे) येणोप्रमाणो
चारशे तोळे वजन आहे. पुतळीचे सोने घडाई नाही.
त्या सोन्याची किं मत दहा लक्ष झाली.’’ नारो
शंक राजवळ जर इतकी संपत्ती तर महादजी शिंदे
आणि दौलतराव शिंदे वगैरेंजवळ ती कि ती असावी?
कि त्येक पटीतच ती असणार!
पेशवेकालीन दागिन्यांचा सोस हा असा. ती
बुडण्याच्या अनेक कारणांपैकी दागिन्यांचा हव्यास
हे तुलनेनं लहानसं असलं तरी ते एक कारण
असणार, यात काय शंका? दागिन्यात वसविलेल्या
दागिन्यांच्या हि:यांच्या कि मतीतही या ऐतिहासिक
कागदपत्रंत विखुरलेल्या अवस्थेत सापडतात-
थोरल्या माधवरावांच्या कारकि र्दीत सन 1767 मध्ये
‘दर रतीस साडेबावीस रु पये याप्रमाणो 163 रती
वजनाचे 25 हिरे खरेदी क रण्यात आले’ म्हणो!
(पेशवे दफ्तर 22) या हिशेबानं प्रत्येक हिरा अंदाजे
3667 रु पयांचा धरला तर त्याची किं मत अंदाजे
91, 688 रु पये होते! तीही इ. स. 1767 मध्ये!
आता बोला!
ब्रिटिशांनी शनिवारवाडय़ावर युनियन ज्ॉक
फ डकाविला तो 1818 मध्ये. तोर्पयत हा सिलसिला
असाच चालू राहिला. अंगावर एखादा ठसठशीत
दागिना नसणं ही मोठीच उणीव असल्याचं मानण्याचा
तो काळ! पाश्चात्यांच्या संपर्कातून आणि
अनुक रणातून ध्यानात आलं की, दागिन्यांचा संग्रह
क रू न पैका कु जवत ठेवण्यापेक्षा तो व्याजी लावणं
किं वा उद्योगधंद्यात गुंतवणं हे अधिक कि फ ायतीचं
आहे. तेव्हापासून नूर पालटला. तेही काळच! पुन्हा
हव्यासाचा मागोवा सुरू च सुरू !