गोडसे पुण्यतिथीविरोधात निदर्शने
By admin | Published: November 16, 2015 03:42 AM2015-11-16T03:42:14+5:302015-11-16T03:42:14+5:30
महात्मा गांधी यांचा हत्यारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नथुराम गोडसे व नारायण आपटे यांची पुण्यतिथी रविवारी (१५ नोव्हेंबर) पनवेलमध्ये शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आल्याने पुन्हा
पनवेल : महात्मा गांधी यांचा हत्यारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नथुराम गोडसे व नारायण आपटे यांची पुण्यतिथी रविवारी (१५ नोव्हेंबर) पनवेलमध्ये शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आल्याने पुन्हा एकदा नव्याने वादाला तोंड फुटले आहे. महाराणा प्रताप बटालीयनच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसने विरोध केला असून, कार्यक्र म स्थळी निदर्शने केली.
महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने २००८ पासून नवीन पनवेलमधील पृथ्वी हॉलमध्ये नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी क्रांतिकारी शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर हे या कार्यक्र माचे आयोजक होते. या कार्यक्र मात एल.आर. बाली लिखित वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशनदेखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्र माला सनातन संस्थेचे अभय वर्तक हे उपस्थित होते. यावेळी प्रीतम कुमार त्यागी, सुरेश जाधव, स्वामी रु द्र गुप्ताचार्य, शर्मेश राठोड, महेश पवार, संतोष मोकल, चंद्रकांत राजपूत, बजरंग म्हात्रे आदींसह शेकडो संख्येने नथुराम गोडसे याचे समर्थक व महाराणा प्रताप बटालियनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्र माला काँग्रेसने विरोध दर्शवत कार्यक्र मस्थळी काळे झेंडे फडकावले. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी निदर्शने करण्यात आली. हा देश गांधींचा, नाही चालणार मारेकऱ्यांचे उदात्तीकरण, नाव घेता गांधींचे उदात्तीकरण गोडसेचे, महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देत, यावेळी कार्यक्रमाला विरोध केला. (प्रतिनिधी)
पुणे : गोडसे परिवारातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशनाला विवेकवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला. अशा माणसाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. गोडसेवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला नव्हता; तर पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
गोडसे परिवारातर्फे रविवारी सायंकाळी नानासाहेब गोडसे यांच्या आनंदी विलास येथे अस्थिकलश दर्शन आणि चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच गोडसेवरील ‘नथुराम एक हुतात्मा संत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार होते. सामाजिक संघटना व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी या पुस्तक प्रकाशनास विरोध दर्शविला.