सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर निदर्शने

By admin | Published: November 8, 2016 04:55 AM2016-11-08T04:55:24+5:302016-11-08T04:55:24+5:30

सांगली—कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काढलेल्या ऊसदराच्या तोडग्यास विरोध करीत सकल

Demonstrations in front of Sadabhau Khot's house | सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर निदर्शने

सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर निदर्शने

Next

इस्लामपूर (जि. सांगली) : सांगली—कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काढलेल्या ऊसदराच्या तोडग्यास विरोध करीत सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपुरातील घरासमोर निदर्शने केली. विठुनामाचा गजर करतानाच खोत यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांनी यातील १९ कार्यकर्त्यांवर जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत.
शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर धडक मारली. मात्र पोलिसांनी ३०० फूट अंतरावरच त्यांना रोखल्यामुळे, जवळपास चार तास तेथेच विठुनामाचा गजर करीत आंदोलक थांबले. खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांचा निषेध करण्यात आला. शंभरावर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
या वेळी बळिराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. एफआरपी अधिक १७५ रुपयांचा तोडगा म्हणजे लबाडाघरचे आमंत्रणच आहे. या तोडग्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ३५०० रुपयांची पहिली उचल घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत.
आता सत्तेत सहभाग असल्यामुळे आंदोलन टाळून तोडग्याच्या नावाखाली पुन्हा त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका असून तो आम्ही हाणून पाडणार आहोत. (वार्ताहर)


सदाभाऊ निघाले दौऱ्यावर
मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतमालाची थेट बाजारत विक्री करण्याची व्यवस्था सुरू केल्यानंतर आता पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन राज्यांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. कांदा आणि इतर शेतमालाचे भाव अधुनमधून पडतात आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. पश्चिम बंगालमध्ये आणि तेथून बांगलादेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्यापैकी ८० टक्के कांदा हा महाराष्ट्रातून जातो. या शिवाय, द्राक्षे, बेदाणे, संत्री, मोसंबी, डाळींबही मोठ्या प्रमाणात पाठविले जाते. हा शेतमाल दलालांच्या विविध टप्प्यांतून पाठविण्याऐवजी त्याला या दोन राज्यांमध्ये थेट बाजारपेठेत विक्रीला नेण्याचा विचार आता समोर आला आहे. त्या दृष्टीनेच या दोन राज्यांमध्ये जाऊन अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोत यांना दिले.

Web Title: Demonstrations in front of Sadabhau Khot's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.