‘ऐ दिल’विरोधात कल्याणमध्ये निदर्शने
By admin | Published: October 29, 2016 02:53 AM2016-10-29T02:53:02+5:302016-10-29T02:53:02+5:30
मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी आणि मनसेच्या माघारीमुळे चर्चेत असलेल्या ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनातील विघ्ने दूर झाली, असे वाटत असतानाच बलिदान
कल्याण : मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी आणि मनसेच्या माघारीमुळे चर्चेत असलेल्या ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनातील विघ्ने दूर झाली, असे वाटत असतानाच बलिदान दिलेल्या जवानांचा विचार करून हा चित्रपट
पाहायला जाऊ नये, अशी मागणी करत शुक्रवारी संभाजी ब्रिगेडने
त्या चित्रपटाविरोधात कल्याणमध्ये निदर्शने केली.
सर्वोदय मॉल परिसरातील मल्टिप्लेक्सबाहेर ही निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानी कलाकारांना आमचा ठाम विरोध आहे. तो मावळलेला नाही. प्रेक्षकांनीही हा चित्रपट पाहू नये, त्यावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चेतन पवार यांनी केले. सध्या दिवाळी असल्याने पुढील चारही दिवस आम्ही शांततेत आंदोलन करू. तोवर चित्रपटाचे खेळ बंद झाले नाहीत किंवा प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला, तर मात्र दिवाळी झाल्यानंतर अधिक आक्रमकपणे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)