गोव्यात मराठीला राजभाषेच्या दर्जासाठी निदर्शने

By admin | Published: August 12, 2016 02:40 PM2016-08-12T14:40:59+5:302016-08-12T14:41:20+5:30

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी राजभाषा समितीतर्फे पणजी येथे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.

Demonstrations for Marathi language status in Marathi | गोव्यात मराठीला राजभाषेच्या दर्जासाठी निदर्शने

गोव्यात मराठीला राजभाषेच्या दर्जासाठी निदर्शने

Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १२ -  मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी राजभाषा समितीतर्फे येथे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. या मागणीसाठी गोव्यात सुमारे पन्नास वर्षाहून जास्त काळ असे आंदोलन केले जात आहे. 
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथे त्यांच्या समाधीस अभिवादन करुन मराठीसाठी सरकारला साकडे घालण्यात आले.
भाऊसाहेब बांदोडकर यांनी माङयानंतरची पिढी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी लढेल, असे म्हटले होते, याची आठवण यावेळी सांगण्यात आली. 
कॅनडामध्ये पंजाबी समाज थोडा असला तरी पंजाबी भाषेला त्या देशाने राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. सिंगापूरमध्ये चार भाषांना राजभाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यात एक तमिळ आहे, अशी उदाहरणो वक्त्यांनी उपस्थितांसमोर दिली. गोवा सरकारने ही उदाहरणो लक्षात घ्यावीत आणि मराठीला तातडीने राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
मगो असे स्वत:च्या पक्षाचे नाव सांगणा:यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक म्हणून स्वत:ला जाहीर करावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली. भाऊसाहेब बांदोडकरांचा हा पक्ष मराठी भाषेसाठी काहीच करत नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली.
  
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या गौरवग्रंथात नव्वद टक्के मजकूर हा मराठीत आहे, हे मुख्यमंत्र्यांनीच लक्षात घ्यावे आणि खोटे बोलणो बंद कारावे, असे आवाहन समितीचे ज्येष्ठ नेते गो. रा. ढवळीकर यांनी यावेळी केले.
यावेळी प्रा. विनय बापट,  विश्वेश प्रभू, प्रकाश मुळीक आदी यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Demonstrations for Marathi language status in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.