एन.एस.यु.आय.तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By admin | Published: July 5, 2016 04:31 PM2016-07-05T16:31:45+5:302016-07-05T16:31:45+5:30
तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत झालेल्या गोंधळप्रकरणी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व तंत्रशिक्षण विभाग, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात जिल्हा
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ५ : तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत झालेल्या गोंधळप्रकरणी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व तंत्रशिक्षण विभाग, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात जिल्हा एन.एस.यु.आय.संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
एन.एस.यु.आय.तर्फे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कारवाई न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी हे गोरगरीब सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. या प्रकरणी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सत्यता तपासून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा एन.एस.यु.आय.तर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या संदर्भात मंडळाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिला.
यावेळी सरचिटणीस सुशील पाटील, देव ठाकूर, प्रथमेश जोशी, स्वप्नील सरोदे, विशाल चौधरी, गोपाल चौधरी, पियुष पाटील, हर्षल माळी, गौरव चव्हाण, गोपाल खरे, पराग खरे, शुभम सराफ, दीपक भिरूड, रिना अत्तरदे, पूजा सरोदे, सायली सरोदे उपस्थित होते.