राज्यात सात दिवसात डेंग्यूचे ४०७ रुग्ण
By admin | Published: October 15, 2016 11:47 AM2016-10-15T11:47:15+5:302016-10-15T11:53:16+5:30
राज्यात साथीचे आजार अजूनही ठाण मांडून बसले असून सात दिवसात डेंग्युचे ४०७ रुग्ण आढळले आहेत
Next
>मुंबई : राज्यातून मान्सून परतला असला तरीही साथीचे आजार अजूनही ठाण मांडून बसले आहेत. राज्यात सात दिवसात डेंग्युचे ४०७ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात असलेल्या चिकनगुनिया आता मुंबईतही आला आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत (७ ऑक्टोबर) एकूण ४ हजार ८२० डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर २५५, नाशिकमध्ये २२२ आणि पुण्यात १६६ डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहेत. तर महापालिका क्षेत्रात मुंबईत ७८३, नाशिकमध्ये ६४० आणि ठाण्यात ४४३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात डेंग्युच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. २६ महापालिका क्षेत्रात ३ हजार २६० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.
पुणे शहर आणि ग्रामिण परिसरात पसरलेली चिकनगुनियाची साथ अजूनही आटोक्यात आली नाही. जानेवारी ते ऑक्टोबर पर्यन्त (७ ऑक्टोबर) पुणे महापालिका क्षेत्र, पिंपरी- चिंचवड, औरंगाबाद येथे ८७७ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण परिसरात २६६ रुग्ण आढळले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात मुंबईत चिकनगुनियाचे ४ रुग्ण आढळून आले आहेत. तर चिकनगुनियाचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)