एकाच बाकावरील मित्रांचा डेंग्यूने मृत्यू

By Admin | Published: September 13, 2016 05:49 AM2016-09-13T05:49:01+5:302016-09-13T05:49:01+5:30

शहरातील सिध्दार्थ नगर व गवळीवाड्यात डेंग्यूची लागण झाली असून शाळेत एकाच बाकावर बसणाऱ्या वर्गमित्रांचा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू झाला

Dengue death of friends on the same side | एकाच बाकावरील मित्रांचा डेंग्यूने मृत्यू

एकाच बाकावरील मित्रांचा डेंग्यूने मृत्यू

googlenewsNext

शिरपूर : शहरातील सिध्दार्थ नगर व गवळीवाड्यात डेंग्यूची लागण झाली असून शाळेत एकाच बाकावर बसणाऱ्या वर्गमित्रांचा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू झाला. दोन्ही मुले पांडू बापू माळी हायस्कूलमध्ये आठवीत शिकत होती.
कार्तिक हिरालाल माळी (१२) व हर्षल बापू माळी (१३) अशी त्यांची नावे आहेत. प्रशासकीय अधिकारी विष्णू गिरासे यांनी कार्तिकला डेंग्यूची लागण झाल्याची खासगी लॅबच्या चाचण्यांच्या आधारे पुष्टी केली आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा रविवारी रात्री ८.३० आणि नऊ वाजता मृत्यू झाला. कार्तिकच्या लहान बहिणीवर धुळे येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़
येथील इंदिरा गांधी नगरपालिका मेमोरियल रूग्णालयात दाखल असलेल्या डेंग्यूच्या आजाराच्या रूग्णांची माहिती देण्यास डॉ़ नितीन निकम यांनी आधी टाळाटाळ केली होती.
मात्र नंतर कार्तिकचा मृत्यू डेंग्युमुळे झाल्याचे सांगितले. रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी विष्णू गिरासे म्हणाले, आठ-दहा दिवसांपूर्वी खासगी लॅबमध्ये कार्तिकच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. त्यानुसार उपचार सुरू होते. या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Dengue death of friends on the same side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.