डेंगीच्या साथीचा उद्रेक

By admin | Published: June 9, 2014 11:19 PM2014-06-09T23:19:29+5:302014-06-09T23:19:29+5:30

येथे डेंगीचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून, रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा आरोग्य यंत्रणोने या प्रकाराची तत्काळ उपाययोजना सुरू केले आहे.

Dengue epidemic | डेंगीच्या साथीचा उद्रेक

डेंगीच्या साथीचा उद्रेक

Next
>कोरेगाव भीमा : येथे डेंगीचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून, रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा आरोग्य यंत्रणोने या प्रकाराची तत्काळ उपाययोजना सुरू केले आहे. गावात औषध फवारणी, गावातच रुग्ण तपासणी व उपचार व गावात कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी ए. डी. देशमुख यांनी दिल्या आहेत. 
22 मे रोजी शिक्रापूर (ता. शिरूर) येथे डेंगीचे रुग्ण आढळले होते. यानंतरही तालुका आरोग्य विभागाने याबाबत तालुक्यात गांभीर्याने दखल न घेतल्याने कोरेगावातही गेले आठवडाभर डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.  या आजाराची लक्षणो असलेले सुमारे 4क्पेक्षाही अधिक रुग्ण स्थानिक रुग्णालयात व पुण्यातही उपचार घेत आहेत. यात काही रुग्ण अत्यावश्यक उपचार घेत आहेत. मागील दोन-तीन दिवसांत डेंगीच्या रुग्णाच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने आज सकाळी गावातील स्थानिक पदाधिका:यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद यांना या गंभीर साथीबद्दल सांगितले असता त्यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी एन. डी. देशमुख यांना कोरेगाव भीमामध्ये जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर देशमुख यांनी तत्काळ तालुका आरोग्य विभागातील पथकासह गावात येऊन उपसभापती आनंदराव हरगुडे, तसेच ग्रामपंचायत पदाधिका:यांसह स्वत: साठवलेल्या पाण्याची पाहणी केली असता प्रत्येक घरामध्ये डेंगीच्या अळ्या पाण्यामध्ये आढळून आल्या. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संजीव जाधव, सरपंच अशोक काशीद, उपसरपंच नीलेश गव्हाणो, माजी सरपंच विजय गव्हाणो, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी आर. डी. ¨शदे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
 
प्रलंबित आरोग्य केंद्राचा प्रश्न लागणार मार्गी 
झपाटय़ाने लोकवस्तीत वाढ होत असलेल्या कोरेगाव भीमामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा जिल्हा आरोग्य अधिकारी एन. डी. देशमुख यांच्यासमोर केली असता त्यांनी सुमारे साडेतीन कोटी खर्चाचे सुसज्ज अशा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी साडेतीन कोटी रुपये निधीही मंजूर असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक जागेची पाहणीही करून, लवकरच कायदेशीर बाबी पूर्ण करून आरोग्य केंद्राचे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. 
 
-22 मे रोजी शिक्रापूर (ता. शिरूर) येथे डेंगीचे रुग्ण आढळले होते. त्यानंतरही तालुका आरोग्य विभागाने याबाबत तालुक्यात गांभीर्याने दखल न घेतल्याने कोरेगावातही आठवडाभर डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सूचना देऊनही तालुका आरोग्य अधिकारी आर. डी. ¨शदे यांनी योग्य पावले न उचलल्याने पंचायत समितीचे उपसभापती आनंदराव हरगुडे यांनी कडक शब्दांत जाब विचारला.

Web Title: Dengue epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.