ठाण्यातील नवरदेवाचा साखरपुड्यानंतर नकार
By admin | Published: December 22, 2015 02:25 AM2015-12-22T02:25:07+5:302015-12-22T02:25:07+5:30
साखरपुड्यानंतर बस्त्यासाठी १ लाख ६० हजार रुपये घेऊनही लग्नास नकार देणाऱ्या ठाणे येथील तरुणासह १३ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
धुळे : साखरपुड्यानंतर बस्त्यासाठी १ लाख ६० हजार रुपये घेऊनही लग्नास नकार देणाऱ्या ठाणे येथील तरुणासह १३ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नियोजित वधूच्या वडिलांनी फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती.
एकतानगरातील सुभाष रामचंद्र बागुल यांच्या फिर्यादीनुसार ठाणे येथील राहुल भाईदास रामराजे याच्यासोबत त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते.
साखरपुडा झाल्यानंतर मुलाकडील मंडळींनी बस्त्यासाठी
१ लाख ६० हजार रुपयेसुद्धा घेतले होते. मात्र नंतर रामराजे कुटुंबाने लग्नास नकार दिला.
पोलिसांनी राहुलसह भाईदास नारायण रामराजे, लीलाबाई भाईदास रामराजे, विजया भाईदास रामराजे (सर्व रा. शिवाईनगर, ठाणे), प्रकाश मोतीराम ब्राह्मणे (रा. वापी, गुजरात), आनंदा कापुरे, संगीता आनंदा कापुरे, दिनेश भिकन रामराजे, सविता दिनेश रामराजे (चौघे, रा. शास्त्रीनगर, ठाणे), विजय थोरात (रा. ऐरोली, नवी मुंबई), कोमल डोंगर रामराजे (रा. ठाणे), देवीदास आनंदा साळवे (रा. उमरदे) व देवाजी हंसाराम कापुरे (रा. नाशिक) यांच्याविरोधात रविवारी हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)