अयोध्या दौऱ्यावरून घमासान; उद्धव ठाकरे यांच्या संवादास संत-महंतांकडून नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:13 AM2018-11-22T05:13:48+5:302018-11-22T05:14:03+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठविलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे.

Denial of Uddhav Thackeray's dialogue by Sant Mahanta | अयोध्या दौऱ्यावरून घमासान; उद्धव ठाकरे यांच्या संवादास संत-महंतांकडून नकार

अयोध्या दौऱ्यावरून घमासान; उद्धव ठाकरे यांच्या संवादास संत-महंतांकडून नकार

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठविलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे. या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात रस असल्याचा आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी केला.
उद्धव यांच्या अयोध्या दौ-यासाठी शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, विनायक राऊत, राजन विचारे आदी नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. दरम्यान, साधू-संतांची सर्वांत मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचे निमंत्रण धुडकावून लावत प्रभू रामचंद्रांवरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात आखाड्याशी संबंधित एकही संत सहभागी होणार नाही. या दोन्ही संघटना केवळ प्रचार आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत असल्याचा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला.
शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत घेत आखाडा परिषदेने २, ५ डिसेंबर रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले तर काहीतरी तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास नरेंद्र गिरी महाराजांनी व्यक्त केला.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सभेला परवानगी नाकारल्याचे वृत्त फेटाळून लावत सभेसाठी परवानगीच मागितली नसल्याचा दावा शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केला.

Web Title: Denial of Uddhav Thackeray's dialogue by Sant Mahanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.